Sunday, August 9, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तरोजगार हमी विभागाच्या उपजिल्हाधिकाऱ्यांवर रेती चोरट्यांचा फावड्याने जीवघेणा हल्ला…-रेती चोरट्याच्या चेहऱ्यावर कराटे...

रोजगार हमी विभागाच्या उपजिल्हाधिकाऱ्यांवर रेती चोरट्यांचा फावड्याने जीवघेणा हल्ला…-रेती चोरट्याच्या चेहऱ्यावर कराटे किक; उपजिल्हाधिकारी मार्शल आर्ट प्रशिक्षणार्थी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- रेती चोरीचे चित्रीकरण केल्याच्या संशयावरून रत्नागिरीतील रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी हर्षलता धनराज गेडाम वय ४९ वर्षे यांच्यावर फावड्याने जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी रत्नागिरी शहरातील पांढरा समुद्र येथे घडला.हा हल्ला करणाऱ्या दोघांना गेडाम यांनीच चोप दिला असून,दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हर्षलता गेडाम शुक्रवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास मुरूगवाडा-पांढरा समुद्र किनाऱ्यावर ‘मॉर्निंग वॉक’ साठी गेल्या होत्या.किनाऱ्यावरून त्या समुद्राचे चित्रीकरण करत होत्या.याचवेळी पांढरा समुद्र येथे दोन सफेद रंगाच्या गाड्या वाळू भरून जात होत्या, तर एक लाल रंगाचा ट्रक मिरकर वाड्याच्या दिशेने उभा होता.त्यामध्ये काही व्यक्ती वाळू भरत होत्या.

चित्रीकरण करत असताना वाळू भरणाऱ्या गाडीतील एक जण त्यांच्या दिशेने आला.त्याने ‘तुम्ही आमच्या गाड्याचे फोटो का काढताय?’ असे विचारले.त्यावर ‘मी समुद्राचे चित्रीकरण करतेय’ असे सांगून त्या रेस्ट हाउसच्या दिशेने चालत निघाल्या.त्याचवेळी तिसरी सफेद रंगाची बोलेरो पिकअप गाडी त्यांच्याजवळ येऊन थांबली.त्या गाडीतून दोघे खाली उतरले आणि त्यांनी ‘तुमचा मोबाइल माझ्याजवळ द्या’ असे सांगत मोबाइल हिसकावून घेऊ लागले.त्याचवेळी त्या थोडे मागे आल्या आणि त्यांनी त्याच्या चेहऱ्यावर कराटे किक मारली.त्यामुळे तो खाली पडला.हे बघून त्याच्यासोबत असलेली अन्य व्यक्ती गाडीतील फावडे घेऊन त्यांच्या अंगावर मारण्यासाठी धावत आली.त्या थोड्या बाजूला झाल्याने तो तसाच पुढे गेला आणि त्यांनी त्याच्या पाठीमागून किक मारली.त्यानंतर किनाऱ्यावरील इतर व्यक्ती मदतीसाठी धावल्या. वातावरण निवळताच गेडाम तिथून निघून आल्या.

हर्षलता धनराज गेडाम,उपजिल्हाधिकारी (रोहयो), रत्नागिरी👇

मी मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेतल्याने मला स्वतःचा बचाव करता आला.प्रत्येकाला स्वतःचा बचाव करता आला पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने बचावाचे प्रशिक्षण घेतले पाहिजे. विशेषतः महिलांना हे प्रशिक्षण गरजेचे आहे. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एकेकाळी ज्या भागात फडकायचे लाल,काळे झेंडे; आता पहिल्यांदाच फडकणार तिरंगा..

उद्रेक न्युज वृत्त :-देशातील नक्षलवादाची संपूर्ण मुळे ३१ मार्च २०२६ पर्यंत उपटून फेकण्यात येणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर करताच राज्याच्या विविध जिल्ह्यातील...

महागाईची झळ; दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतीसह दूध विक्रीत होणार वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-अगोदरच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असतांनाच आता त्यात आणखी भर पडून दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिकांनी दूध विक्रीच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची...

गडचिरोलीची बदनामी करण्याचा डाव; नागरिकांनी तथ्य पडताळूनच माहिती शेअर करावी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था आणि रस्त्यांच्या स्थितीबाबत जुनी, वस्तुस्थितीशी विसंगत तसेच अन्य राज्यांतील छायाचित्रे गडचिरोलीतील असल्याचे भासवून...

शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती प्रक्रियेस सुरुवात; राज्यात ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र पोर्टल'द्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरू करण्यात आली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!