Thursday, April 16, 2026
Homeगडचिरोलीराष्ट्रीय जंतनाशक दिन; उद्याला गडचिरोली जिल्ह्यात १ लाख ९० हजार ९९४...

राष्ट्रीय जंतनाशक दिन; उद्याला गडचिरोली जिल्ह्यात १ लाख ९० हजार ९९४ बालकांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील आरमोरी व चामोर्शी तालुके वगळता इतर १० तालुक्यात १ ते १९ वयोगटातील एकूण १ लाख ९० हजार ९९४ बालकांना उद्या,बुधवार दिनांक-४ डिसेंबर रोजी जंतनाशक गोळी दिली जाणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यात उद्या ४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन राबविण्यात येणार असून या दिवशी १ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींना आरोग्य विभागाच्या वतीने जंतनाशक गोळी दिली जाणार आहे.आरोग्य विभागाने याबाबत नियोजन केले असून शिक्षण विभाग व बाल कल्याण विभाग यांच्या समन्वयाने जिल्ह्यातील १ लाख ९० हजार ९९४ मुला-मुलींना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. जंतामुळे बालकांमध्ये व किशोरवयीन मुला-मुलींमध्ये ॲनिमिया,पोटदुखी,उलट्या,अतिसार,मळमळ,भूक मंदावणे आदी आजारांचा धोका उद्भवतो.त्यामुळे हा संभाव्य धोका टाळण्यासाठी १ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींनी जंतनाशक गोळी घ्यावी; असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी केले आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागाने राष्ट्रीय जंतनाशक दिनाची तयारी केली असून,वैद्यकीय अधिकारी, शिक्षक व इतर संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.जिल्ह्यातील १७१३ अंगणवाडी केंद्रे,११९० जिल्हा परिषद शाळा,८४ आश्रमशाळा,९२ खाजगी शाळा,१४ महाविद्यालय,१५१ सरकारी महाविद्यालय असे एकूण ३२४४ संस्थामधून मुला-मुलींना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे.काही कारणास्तव ४ डिसेंबरला ज्या बालकांना जंतनाशक गोळी दिली गेली नसेल अशा वंचित सर्व बालकांना १० डिसेंबरला मॉप-अप दिनी ही गोळी देण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांनी कळविले आहे.
जंतामुळे मुलांमध्ये ॲनिमिया,पोटदुखी,उलट्या, अतिसार,मळमळ,भूक मंदावणे यासह कुपोषण,वाढ खुंटणे आदी आजारांचा मुलांना धोका असतो.त्यामुळे १ ते १९ वयोगटातील मुलांना वर्षातून दोन वेळा जंतनाशक गोळी देणे आवश्यक आहे.आरोग्य विभागाकडून सप्टेंबर आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत जंतनाशक मोहीम राबविली जाते.या मोहिमेदरम्यान १ ते १९ वयोगटातील मुलांना अर्धी ते एक गोळी खायला किंवा पाण्यात विरघळून दिली जाते,अशी माहिती जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.प्रफुल्ल हुलके यांनी दिली.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जंतनाशक दिनी १ ते २ वर्षे वयोगटातील बालकांना २०० मि.ग्रॅ.अल्बेंडाझोलची गोळी पावडर करून पाण्यात विरघळून देण्यात येते.२ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना ४०० मि.ग्रॅ.गोळी पावडर करून व पाण्यात विरघळून देण्यात येते.६ ते १९ वर्षे वयोगटाच्या बालकांना ४०० मि.ग्रॅ.गोळी चावून खाण्यास किंवा पावडर करून पाण्यात विरघळून देण्यात येते.
बालकांच्या आरोग्याविषयी काही शंका असल्यास आरोग्य सल्ला व मार्गदर्शन केंद्राच्या टोल फ्री क्रमांक १०४ वर नागरिक संपर्क करू शकतात किंवा गरज भासल्यास तातडीच्या वैद्यकीय सेवेअंतर्गत कार्यरत रुग्णवाहिका सेवेच्या टोल फ्री क्रमांक १०८ वर संपर्क करुन रुग्णवाहिका मागवू शकतात.
या ठिकाणी मिळते मोफत गोळी👇
अल्बेंडाझोल ही गोळी शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये मोफत दिली जाते.आरोग्य उपकेंद्र,प्राथमिक आरोग्य केंद्र,ग्रामीण रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय यासोबतच अंगणवाडी,शाळा, महाविद्यालयांतही या गोळ्या मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.जंतसंसर्गाच्या प्रतिबंधासाठी दिली जाणारी ही जंतनाशक गोळी पूर्णपणे सुरक्षित आहे आणि मोठ्या प्रमाणावर जंतनाशक कार्यक्रमांसाठी वापरण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेद्वारे प्रमाणित करण्यात आलेली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता खतांचा साठा उपलब्ध होण्याच्या चोवीस तास आधीच माहिती सार्वजनिक करणे बंधनकारक.. – प्रत्येक खत विक्रेत्याकडे लक्ष ठेवण्यासाठी सहाय्यक कृषी अधिकारी व उपकृषी अधिकाऱ्यांची...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-खरीप हंगाम जवळ येत असतांना शेतकऱ्यांना वेळेवर आणि रास्त दरात खत उपलब्ध व्हावे तसेच कृत्रिम टंचाई व काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने...

आज राज्याच्या पर्यावरण,वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे चंद्रपुरात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्याच्या पर्यावरण,वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे ह्या आज,गुरुवार १६ एप्रिल रोजी चंद्रपूर दौऱ्यावर असणार असून आज सकाळी अकरा वाजता...

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!