Thursday, October 22, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोलीतील रक्षकच बनला भक्षक.. - अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण...

गडचिरोलीतील रक्षकच बनला भक्षक.. – अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-रक्षकच जेव्हा भक्षक बनत असेल तर या जगात विश्वास कुणावर ठेवायचा.एका ५२ वर्षीय पोलीस हवालदाराने एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याची घटना उघडकीस आल्याने जिल्हा पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. गडचिरोली पोलीस मुख्यालयात कार्यरत पोलीस हवालदाराने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी काल,सोमवारी २ डिसेंबरला अत्याचार कायद्यान्वये हवालदारावर गडचिरोली पोलिस ठाण्यात बलात्कार व बाललैंगिक गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,गडचिरोली जिल्हा पोलिस मुख्यालयात पोलीस हवालदार या पदावर कार्यरत बंडू गेडाम वय ५२ वर्षे,रा.नवेगाव ता.गडचिरोली याने एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे.मुलीने गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे आणि अजय जगताप यांच्याकडे घडलेल्या प्रकरणाचा उलगडा केला.त्यामुळे महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या खाकी वर्दीतीलच कर्मचाऱ्याने असे कृत्य करणे हे अशोभनीय असल्याने काल सोमवारी सायंकाळी बंडू गेडामविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दोन बालकांना मिळाले हक्काचे कुटुंब; कोलकाता व ठाणे येथील कुटुंबीयांनी स्वीकारले पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विशेष दत्तक संस्थेच्या देखरेखीतील दोन बालकांना आज गुरुवारी हक्काचे कुटुंब आणि मायेची ऊब मिळाली.जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दत्तक आदेशांवर स्वाक्षरी करून...

भारतीय वन सेवेतील पाच परिविक्षाधीन अधिकाऱ्यांची सहाय्यक वनसंरक्षक पदावर पदस्थापना..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय वन सेवेतील सन २०२४ च्या तुकडीतील पाच परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना सहाय्यक वनसंरक्षक पदावर पदस्थापना देण्यात आली आहे.या संदर्भात आज,गुरुवार २२ ऑक्टोंबर...

विधान परिषद निवडणूक; घरबसल्या मोबाईलवर तपासा तुमचे मतदार यादीतील नाव..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी होणार असून येत्या २७ ऑक्टोंबर रोजी मतमोजणी होणार आहे.त्यानुसार,मतदारांची नावे...

पदवीधर निवडणुकीसाठी गडचिरोली जिल्ह्यात २६ केंद्रांवर मतदान; १३ हजार ६०८ मतदारांची नोंदणी.. -चार तालुक्यांतील मतदानाच्या वेळेत बदल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी गडचिरोली जिल्ह्यातील २६ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.जिल्ह्यात १३...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!