Friday, June 19, 2026
Homeदेसाईगंजराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देसाईगंज तालुकाध्यक्ष  क्षितिज उके तर शहराध्यक्ष अशोक माडावार.....

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देसाईगंज तालुकाध्यक्ष  क्षितिज उके तर शहराध्यक्ष अशोक माडावार…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

संपादक/सत्यवान रामटेके

देसाईगंज :- शहरातील व तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (शरदचंद्र पवार गट) धुरा सांभाळण्यासाठी व पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्ष वाढीसाठी काल दिनांक-२८ जुलै २०२३ रोजी दुपारच्या सुमारास देसाईगंज येथील विश्रामगृहात मान्यवर,पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पाडण्यात आली.

बैठकी दरम्यान, पूर्वी जे झालं ते विसरून नव्याने व जोमाने सर्वसामान्य जनतेची असलेली कळकळ लक्षात घेता; जबाबदारी पार पाडण्यासाठी नियुक्त्या करणे आवश्यक असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांच्या मार्गर्शनाखाली,मान्यतेने व कार्यकर्त्यांच्या पसंतीनुसार देसाईगंज तालुकाध्यक्ष क्षितिज उके तर शहराध्यक्ष अशोक माडावार यांची नियुक्ती सर्वानुमते करण्यात आली आहे.

मागील काही दिवसात अनेक राजकीय घडामोडी घडल्या.मात्र शरद पवार यांचे समर्थक म्हणून पदाधिकारी,कार्यकर्त्यांची,सर्वसामान्य नागरिकांची देसाईगंज तालुक्यातील विश्रामगृह येथे लागलेली रीघ पाहून अनेकांचा आत्मविश्वास अधिक उंचावला आहे. काहीजण पैश्याच्या हव्यासापोटी इकडून तिकडे उडी मारतांना दिसून येतात.अशातच सतत व निरंतर पक्षाशी एकनिष्ठ राहणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना न पटणारे कृत्य आजच्या घडीला दिसून येत असेल तरीही शरद पवारांशी अनेकांची जुळलेली नाळ कुणीही तोडूच शकणार नाही; हे काल झालेल्या बैठकी दरम्यान दिसून आले आहे.त्यानुसारच सदर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

सदर नियुक्त्या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते श्याम धाईत,हेमराज परशुरामकर,ओम शर्मा, नामदेव मेश्राम,तुलाराम लाकडे,हितेश गजघाटे, कपिल बोरकर,रोशन शेंडे,सत्यवान रामटेके,अविनाश राघोर्ते, वेंकटेश ताडपल्लीवार,वनमाला पुस्तोडे, द्रौपदीताई सुखदेवे,शीलाताई परशुरामकर,नजमा पठाण,प्रतिभाताई साखरे,कल्पनाताई वासनिक, वैष्णवीताई आकरे,पुष्पाताई सुरकाट,दलेरभाऊ वासनिक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गडचिरोली हे भविष्यात देशातील महत्त्वाचे औद्योगिक व पोलाद उत्पादन केंद्र म्हणून...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ बनविण्याच्या उद्देशाने केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाने गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात,अशी...

माजी सैनिकास पैश्याची मागणी; महिला लिपिक एसीबीच्या कचाट्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-एका ३६ वर्षीय महिला लिपिकेस(महसुल सहाय्यक)माजी सैनिक यांचे ताब्यात असलेली सिलींगची अतिक्रमीत जमीन माजी सैनिक म्हणुन त्यांचे नावावर नियमीत करुन देण्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!