Sunday, April 19, 2026
Homeपुणेयू- डायस प्रणालीकडे दुर्लक्ष करणाऱ्या राज्यातील शिक्षकांना नोटिसा….

यू- डायस प्रणालीकडे दुर्लक्ष करणाऱ्या राज्यातील शिक्षकांना नोटिसा….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

पुणे :- ‘यू- डायस प्लस’ पोर्टलमध्ये पटसंख्येच्या तुलनेत विद्यार्थी,शिक्षकांची माहिती भरलेली नाही, अशा राज्यातील शेकडो शिक्षकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहे.शासनाने यू-डायस प्रणालीमध्ये शाळांबाबत माहिती भरण्याच्या सूचना देऊनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष केल्याने तुमचे पगार का रोखू नये ? असे नोटीसमध्ये म्हटले आहे.यू-डायस प्लस प्रणालीमधून प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे केंद्र सरकार समग्र शिक्षा योजनेचे वार्षिक नियोजन व अंदाजपत्रक,राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, राज्यनिहाय शैक्षणिक निर्देशांक, नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे,स्कूल एज्युकेशन क्वालिटी एज्युकेशन इंडेक्स निर्देशांकांची प्रभावीपणे अंमलबजावणी व नियंत्रण करण्याचे नियोजन करणार आहे.त्यासाठीच राज्यातील पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंत शिक्षण देणाऱ्या शाळांची माहिती ‘यू-डायस प्लस’ प्रणालीमध्ये टप्याटप्याने भरण्याची सूचना दिली होती.मात्र,अनेक शाळांनी ही माहिती भरण्यास टाळाटाळ केल्याने शिक्षण विभागाने शिक्षकांना नोटिसा बजावण्याचा धडाका सुरू केला आहे.

जयश्री चव्हाण,शिक्षणाधिकारी 👇

काही शाळांनी ‘यू-डायस प्लस’ प्रणालीमध्ये शाळेच्या पटसंख्येच्या तुलनेत मुलांची संख्या कमी नोंदवली आहे.शासनाने वारंवार भरविलेल्या ‘यू-डायस’ शिबिराला एकही दिवस उपस्थिती दर्शवली नाही. या शाळांमधील विद्यार्थ्यांची आधार नोंदणी कमी आहे. संबंधित शाळा अजिबात प्रतिसाद देत नसल्याने शाळांसह शिक्षकांना पगार रोखण्याबाबत नोटिसा बजावल्या आहेत.  

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची; सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाची...

चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच उडाला भडका; पतीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-स्वयंपाकघरातील गॅस लिकेज असल्याने चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच आगीचा अचानकपणे भडका उडाला आणि काही क्षणातच सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला.दरम्यान,संपूर्ण घरात...

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!