Saturday, May 2, 2026
Homeनागपूरमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पालकमंत्री पदाबाबत केले स्पष्ट... - मुख्यमंत्री कुठलेही पालकत्व ठेवत...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पालकमंत्री पदाबाबत केले स्पष्ट… – मुख्यमंत्री कुठलेही पालकत्व ठेवत नसतात; पण माझी स्वतःची इच्छा आहे…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-राज्यातील मंत्री खाते वाटप झालीत,मात्र काही जिल्ह्यातील पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटलेला नाही.अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज,बुधवारी २५ डिसेंबरला नागपुरातील पत्रकार परिषद घेतली.पत्रपरिषदेत बोलतांना फडणवीस म्हणाले की,पालकमंत्र्याच्या संदर्भात आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे इतर दोन्ही पक्षांसोबत बसून कुठे कोण पालकमंत्री असेल याचा निर्णय करतील.ते जो निर्णय करतील तो मला मान्य असेल,त्यांनी मला बीडला जायला सांगितले तर मी बीडला देखील जाईल,किंवा त्यांनी जिथे जायला सांगितले तिथे जाईल.साधारणपणे मुख्यमंत्री कुठले पालकत्व ठेवत नसतात.पण माझी स्वतःची इच्छा आहे; गडचिरोली मात्र मी स्वतःकडे ठेवू इच्छितो,अर्थात या तीन नेत्यांनी मान्यता दिली तरच मी ते ठेवेन,असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे.यावेळी त्यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरून काँग्रेसलाही लक्ष्य केले. झोपलेल्याला जागवले जाऊ शकते.मात्र झोपेचा सोंग घेणाऱ्याला जागवता येत नाही.काँग्रेसला माहित आहे की,ईव्हीएम टेम्परप्रुफ आहे,खरं तर या मशीन टेम्परींचे पुरावे सादर करण्यासाठी आयोगाने त्यांना संधी दिली होती.मात्र, काँग्रेस सिद्ध करू शकले नाही.हे लोक निवडणूक हरले की ईव्हीएमला दोष देतात आणि जिंकले की तर लोकशाही जिंकली असे म्हणतात,अशीही टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!