Sunday, June 28, 2026
Homeदेसाईगंजमहसूल विभाग जागते रहो..! रात्रीच्या अंधारात कोंढाळा-रवी मार्गे चालतोय अवैध रेती...

महसूल विभाग जागते रहो..! रात्रीच्या अंधारात कोंढाळा-रवी मार्गे चालतोय अवैध रेती वाहतुकीचा खेळ..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-अनेकांचे हात ओले केल्याशिवाय कोणताही अवैध धंदा हा सुरळीत चालत नसतो,असे अवैध धंदे करणाऱ्या काही तथाकथितांची भविष्यवाणी ही खरीच असल्याचा प्रत्यय आजच्या घडीला सर्वत्र उदयास आला आहे.अशातच अवैध वाळू उपशामुळे शासनाच्या महसुलात कोट्यवधी रुपयांचा चुना लागला आहे.गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांनी अवैध वाळू वाहतुकीवर आळा घालण्यासाठी जिल्ह्यात चौक्या उभारल्या आहेत. चौक्या तर उभारल्या,पण चौक्या चुकवून इतर वाम मार्गाने अजूनही अवैधरित्या रेतीची वाहतूक केली जात असल्याचे प्रकार उघडकीस येऊ लागले आहे. असाच प्रकार रात्रीच्या अंधारात कोंढाळा-रवी मार्गे सुरू झाल्याची खमंग चर्चा आहे.त्यामुळे महसूल विभाग जागते रहो..! अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
राज्याच्या नव्या वाळू धोरणानुसार सकाळी ६ वाजल्यापासून ते सायंकाळी ६ वाजे पर्यंत लिलाव झालेल्या वाळू घाटातून वाळू उपशासह वाहतूक चालान नुसार वाहतूक व्हायला पाहिजे.मात्र,काही ठिकाणी तसे न होता,रात्रीचे सात ते आठ वाजे पर्यंत वाळू उपसा करून वाहतूक केली जात आहे.अशातच  कोंढाळा-रवी मार्गे एकही चौकी पडत नसल्याने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत काही मुजोर रेती तस्कर अवैध रेतीची वाहतूक करीत आहेत.त्यातच बऱ्याच कालावधीपासून काही भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी सुधरत नसल्याने अश्यांना न्यायालयाचा दणका येत्या काही दिवसांत मिळणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे.काहींचे मोठ्या प्रमाणावर साटेलोटे रेती चोर व भ्रष्टाचाऱ्यांशी असल्याने ‘जाऊ द्या तो आपलाच कार्यकर्ता आहे’ असे करून अंधारात खेळ सुरू आहे.यावर आवर घालणाऱ्यांची बाजू घेणारेच चोरांचे साथीदार असल्याने काहीजण हताश होऊ लागले आहेत.त्यामुळेच रात्रीच्या अंधारात कोंढाळा-रवी मार्गे चालतोय अवैध रेती वाहतुकीचा खेळ..!
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोबाईल बँकिंग ॲप अपडेट करण्याच्या बहाण्याने व्यापाऱ्याला चुना.. – सायबर चोरट्यांनी ९ लाख ९७ हजार उडवले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-मोबाईल बँकिंग ॲप अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी एका धान्य व्यापाऱ्याची तब्बल ९ लाख ९७ हजार ७८० रुपयांची फसवणूक केली.या प्रकरणी...

अवैध रेती उत्खनन प्रकरणी मंडळ अधिकारी व तलाठ्याची विकेट.. – देसाईगंज तहसीलदारही होणार निलंबित; कोंढाळा-सिंड्राई रेती घाट प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील  कोंढाळा-सिंड्राई वैनगंगा नदी रेतीघाट परिसरात अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या घटनेची गंभीर...

उद्या होणारी शिक्षक पात्रता परीक्षा रद्द; पेपरफुटीने खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी 'नीट यूजी-२०२६' ची परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द करून नव्याने घ्यावी लागल्याने देशभरात एकच खळबळ उडाली होती.अश्यातच आता...

उद्याला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम.. -२ हजार ३०८ लसीकरण केंद्रे,१२३ ट्रान्झिट व ९८ मोबाईल पथके सज्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये,या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत उद्या,रविवार २८ जून २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!