Sunday, September 6, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआईचा पाय घसरला अन् २१ व्या मजल्यावरून सात महिन्याचा बाळ खाली कोसळला...

आईचा पाय घसरला अन् २१ व्या मजल्यावरून सात महिन्याचा बाळ खाली कोसळला…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-मोठ-मोठ्या शहरांमध्ये उंचच-उंच इमारती उभारल्या जातात.जिकडे पाहावे तिकडे वर मान केल्याशिवाय पर्याय नाही.अशातच कुशीत असतांना आईचा पाय घसरल्याने हातातील बाळ थेट २१ व्या मजल्यावरून खाली पडल्याने सात वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पालघरच्या विरार पश्चमी येथील जॉय विला कॉम्प्लेक्समधील पिनॅकल सोसायटीत काल,बुधवारी २३ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान घडली.
विकी सेदानी आणि पूजा सेदानी हे दाम्पत्य पिनॅकल सोसायटीच्या २१ व्या मजल्यावर वास्तव्यास होते. त्यांना सात वर्षांनी मुलगा झाला होता.त्याचे नाव व्रिशांक उर्फ वेदला असे ठेवले.घटनेच्या वेळी मुलास झोप येत नसल्याने त्याची आई पूजा सेदानी या त्याला कुशीत घेत बेडरूममध्ये फिरत होत्या.थोडी हवा यावी म्हणून त्यांनी बाल्कनीची स्लायडिंग खिडकी उघडी ठेवली.तिथली फरशी ओलसर असल्याने पूजा यांचा पाय घसरला आणि त्या बाल्कनीच्या दिशेने पडल्या,यात त्यांचे कुशीत असलेले बाळ बाल्कनीमधून थेट खाली पडले.यानंतर तातडीने बाळाला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले.मात्र,डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!