Thursday, April 30, 2026
Homeगडचिरोलीबेरोजगार युवकांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन…-३५० युवक-युवतींची नोंदणी;...

बेरोजगार युवकांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन…-३५० युवक-युवतींची नोंदणी; ६ हजार,८ हजार व १० हजार मिळणार विद्यावेतन…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- जिल्ह्यात शिक्षण पूर्ण करुन नोकरीसाठी अनुभवाच्या शोधात असलेल्या युवा वर्गाला विद्यावेतनासह शिक्षणाच्या बळावर अनुभवाची जोड देता यावी या उद्देशाने राज्य शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे.या योजनेंतर्गत युवकांना विद्यावेतनासह नोकरीचा अनुभव मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध झाली असून बारावी पास,आयटीआय, पदविका आणि पदविधर किंवा पदव्युत्तर युवकांनी या योजनेच्या लाभासाठी पुढे यावे; असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे. 

उमेदवारांनी विविध शासकीय,निमशासकीय कार्यालयातील तसेच उद्योजकाकडील विविध पदावररील कामाचा अनुभव प्राप्त करण्यासाठी सहा महिन्याकरिता इंटर्नशीप म्हणून ज्युनिअर अकाऊंट ऑफिसर,ज्युनिअर इंजिनिअर,ज्युनिअर क्लर्क, असिस्टंट अकाऊंट आफिसर,प्राथमिक शिक्षक,माध्यमिक शिक्षक,डाटा एन्ट्री ऑपरेटर, संगणक ऑपरेटर या पदाकरिता उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावे.

बारावी पास विद्यार्थ्यांना प्रतिमहा सहा हजार, आयटीआय/पदविका उत्तीर्ण युवकांना आठ हजार व पदविधर/पदव्युत्तर युवकांना दहा हजार असे भरघोस विद्यावेतन या योजनेअंतर्गत दिले जाणार आहे.हे विद्यावेतन प्रशिक्षणार्थींच्या थेट बँक खात्यात ऑनलाईन पध्दतीने दरमहा राज्य शासनाकडून अदा केले जाईल.याव्यतिरिक्त उद्योगांकडूनही प्रशिक्षणार्थ्यांना विद्यावेतन देण्याची मुभा असेल.  प्रशिक्षणार्थी एका ‍ महिन्यात दहा दिवस किंवा त्यापेक्षा जास्त ‍दिवस गैरहजर असेल तर त्या महिन्याचे विद्यावेतन त्यांना दिले जाणार नाही.या योजनेंतर्गत खाजगी क्षेत्रातील उद्योजकांना एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या १० टक्के व सेवा क्षेत्रासाठी २० टक्के तर शासनाच्या शासकीय/निमशासकीय या आस्थापना/उद्योग/ महामंडळ यामध्ये मंजूर पदाच्या ५ टक्के इतके उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील.गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत विविध आस्थापनांकडून ५१० मनुष्यबळाची मागणी नोंदविण्यात आली आहे तर ३५० उमेदवारांनी योजनेच्या लाभासाठी संकेतस्थळावर अर्ज केले आहेत.

या योजनेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. याचबरोबर उमेदवाराचे वय किमान १८ व कमाल ३५ वर्ष असावे.उमेदवार महाराष्ट्राचा अधिवासी असावा.त्याची आधार नोंदणी आवश्यक असून बँक खातेही आधारशी संलग्न असावे; असे स्पष्ट करण्यात आले आहे.ज्या आस्थापनांना पुढे यायचे आहे त्या आस्थापना/उद्योगाची स्थापना किमान तीन वर्षापूर्वीची असावी.अधिक माहितीसाठी  सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास विभाग,बॅरेक क्रमांक-२,जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ,गडचिरोली येथे संपर्क साधावा; असे कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेंद्र शेंडे यांनी कळविले आहे. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

कायदा हा लवचिक आणि बदलत्या काळाशी सुसंगत असावा- सर्वोच्च न्यायालय – गर्भपाताची परवानगी दिली नाही; तर पीडितेच्या मनावर आयुष्यभर न पुसली जाणारी जखम आणि...

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच २४ एप्रिल २०२६ रोजी न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने एका १५ वर्षीय बलात्कार पिडीत तरुणीला ३० आठवड्यांचा...

बच्चू कडूंनी धनुष्यबाण घेतला हाती; शेतकरी,मजूर,दिव्यांगांसाठी निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दिव्यांग,शेतकरी आणि गोरगरिबांसाठी लढणारा 'रॉबिनहूड' नेता माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!