Saturday, June 13, 2026
Homeगडचिरोलीपुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या तिघांचे गावकऱ्यांनी वाचवले प्राण…-मोटरसायकल गेली पुरात वाहून…

पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या तिघांचे गावकऱ्यांनी वाचवले प्राण…-मोटरसायकल गेली पुरात वाहून…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असताना दुचाकी काढण्याचा प्रयत्न करताना गडचिरोलीहून नागपूरला जाणाऱ्या  तिघांवर प्राण गमावण्याची वेळ आली होती.परंतु ही बाब स्थानिक नागरिक व आपत्ती व्यवस्थापन पथकाला कळताच त्यांनी तत्परता दाखवून संबंधित तीघांचे प्राण वाचवले.याबाबत जिल्हाधिकारी संजय दैने यांनी संबंधित नागरिकांचे विशेष कौतुक केले आहे.काल, दिनांक-२५ जुलै ला मौजा चुरचुरा माल येथे  चुरचुरा-नवरगाव रस्त्यावरील नाल्यावरील पाणी वाहत असताना नागपूर येथील रहिवासी राहुल किशोर मेंढे वय ३२ वर्ष,आशा किशोर मेंढे वय ६५ व त्याचा भाचा दत्तश्री शरद गोडे वय १२ वर्ष  हे तिघे आपल्या दुचाकीने गडचिरोली वरून नागपूर ला जाताना नाल्यावरील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अडकून काही अंतरावर वाहत गेले.त्याच वेळी त्यांनी गावातील जवळ असलेल्या लोकांना हाक दिल्याने चुरचुरा येथील तैराक अनिल वामन गेडाम व त्यांचे इतर सहकारी यांनी जीवाची पर्वा न करता त्या तिघांचे प्राण वाचविले.त्यानंतर जिल्हा पथके,तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती गडचिरोली ची चमू तहसीलदार हेमंत मोहरे,मंडळ अधिकारी रुपेश गोरेवार,महिला  तलाठी भुरसे यांनी त्यांना गावात आणून कृष्णा रेड्डी, निलेश तेलतुंबडे,सी एच ओ,आशा स्वयंसेवक,आपदा मित्र,पोलिस पाटील,कोतवाल यांच्या उपस्थितीत  त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले व त्यांना  गडचिरोली येथे सुरक्षितपणे स्थलांतरित करण्यात आले.

सदरची घटना सायंकाळच्या सुमारास ७ ते ८ वाजेच्या दरम्यान घडली. यात मोटरसायकल पुरात वाहून गेली आहे.

पुलावरून पाणी वाहत असताना कोणतेही वाहन टाकू नये; अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून वारंवार देण्यात येत आहे.या सूचनांकडे दुर्लक्ष करून आपला जीव नाहक धोक्यात घालू नये व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे; असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

त्वरा करा..! रेशन दुकानातून तांदूळ अन् गहू उचलण्यासाठी उरले केवळ दोनच दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-गरजू नागरिकांना पुरवठा विभागातर्फे स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य वितरण करण्यात येते.मे व जून महिन्याचे धान्य वाटप करण्याची अंतिम तारीख १५ जून...

खर्रा खाणाऱ्यांनो सावधान..! बाजारात नकली तंबाखूचा शिरकाव.. – मशीनच्या सहाय्याने नकली तंबाखू तयार करणाऱ्यासह ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विदर्भातील बऱ्याचश्या जिल्ह्यात आजही जवळपास ७० ते ८० टक्के लोकं खर्रा खाण्याचे शौकीन आहेत.तंबाखूची वाढती मागणी लक्षात घेता "मरणारे मरोत आणि...

देसाईगंज शहरातील पाणी पुरवठा योजनेचे काम संथगतीने करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत देसाईगंज शहरात कोट्यवधी रुपयांचे पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने कामाच्या विलंबामुळे शहरातील नागरिकांना पिण्याच्या...

बांधकाम कामगार योजनांचा लाभ घेण्यासाठी ९० दिवस काम केल्याचे बनावट प्रमाणपत्र; ११ जणांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कंत्राटदार,ऑनलाइन सेवा केंद्र संचालक व एजंट यांच्या संगनमताने करण्यात आलेल्या बोगस कामगार नोंदणीचे रॅकेट उघडकीस येताच तब्बल ११ जणांवर गुन्हे दाखल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!