- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-एका सार्वजनिक कार्यक्रमात न्यायव्यवस्था, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधाने केल्याप्रकरणी आज,सोमवार ३ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध वकील ॲड.असीम सरोदे यांची
महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने वकिलीची सनद तब्बल तीन महिन्यांसाठी रद्द केली आहे.त्यातच, त्यांच्यावर २५ हजार रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे.पुढील तीन महिने सरोदे यांना कुठल्याही न्यायालयात युक्तिवाद करता येणार नाही.ॲड.सरोदे हे सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेल्या अत्यंत महत्त्वाच्या सुनावणीत सहभागी होते.मात्र,बार कौन्सिलने घेतलेल्या निर्णयामुळे खटल्याच्या पुढील प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
मुंबईच्या वरळी येथील एका आयोजित सार्वजनिक कार्यक्रमात ॲड.सरोदे यांनी न्यायव्यवस्था,राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांच्याबद्दल काही आक्षेपार्ह विधाने केली होती.या वक्तव्यांमुळे न्यायव्यवस्थेचा अपमान झाला असून न्यायालयांविषयी नागरिकांमध्ये अविश्वास निर्माण झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.या प्रकरणी १९ मार्च २०२४ रोजी बार कौन्सिलकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली होती.त्यानंतर ॲड.विवेकानंद घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली समितीने या तक्रारीची दखल घेत सखोल चौकशी केली.विवेकानंद घाटगे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने असीम सरोदे यांच्या भाषणाचे ट्रान्सक्रिप्ट आणि व्हिडिओ क्लिप बघितल्या असता असीम सरोदे हे व्हिडिओमध्ये “राज्यपाल फालतू आहेत” व “न्यायालय सरकारच्या दबावाखाली काम करत आहे”.असे वक्तव्य करतांना आढळून आले.प्रकरणी बार कौन्सिलने ॲड.असीम सरोदे यांना आपल्या वादग्रस्त विधानांसाठी लेखी माफी मागण्याची संधी देण्यात आली होती.मात्र, त्यांनी माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला होता.त्यामुळे सदरची कारवाई करण्यात आली.बार कौन्सिलने घेतलेल्या कठोर निर्णयामुळे वकीलांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
- Advertisement -

