उद्रेक न्युज वृत्त
पोटगांव(देसाईगंज) :- औद्योगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंज तर्फे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत पोटंगाव येथे काल,सोमवार दिनांक- ४ मार्च २०२४ रोजी निवासी श्रमसंस्कार विशेष शिबिराचे थाटात उद्घाटन व एन.एस.एस.तर्फे ध्वजारोहण विजयज दडमल सरपंच यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर शिबीर ३ मार्च ते ९ मार्च २०२४ पर्यंत आयोजित करण्यात आलेला आहे.त्यामध्ये नियोजित उद्घाटक आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे, पंकज वंजारी उपसरपंच,नरेंद्र गजपुरे ग्रा.प.सदस्य, तंटामुक्त गाव समिती सी.एम.रणदिवे,सौ.दिपमाला राऊत ग्रा.प.सदस्य,बी.टी.दोनाडकर पोलिस पाटील, पंकज लाडे,सौ.जी.व्ही.मस्के प्रभारी मुख्याध्यापक, एन. डी.गहुकर,आर.एम.गोतमारे गटनिदेशक,सुरेश एस.चौधरी प्राचार्य यांच्या मार्गदर्शनात सदर शिबीर आयोजीत केले आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सी.एम.गरमळे रा.से.यो.मुख्य समन्वयक यांनी केले तर मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणय राऊत रा.स.यो.चे प्रशिक्षणार्थी प्रतिनिधी यांनी आणि आभार प्रदर्शन व्ही.वाय. नागमोती रा.से.यो. सहसमन्वयक यांनी केले.
सदर कार्यक्रमासाठी श्रीमती एम.एस जाधव गटनिदेशिका, सी.डी.समर्थ,के.एस.उमक, आर.बी.भोयर,कु.मेघा चौदंते,कुमारी क्षमा बोंद्रे,एस.ए. पिलारे,एच.एस.मरसकोले,शिबिरातील सर्व स्वयंसेवक,ग्रामपंचायत कर्मचारी व जील्हा परिषद शाळेतील कर्मचारी व समितितील सदस्य यांनी सहकार्य केले.

