Thursday, September 3, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यासह गोंदिया,चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे ६०० राईस मिल बंद अवस्थेत…..-इतर राज्यांप्रमाणे दर...

गडचिरोली जिल्ह्यासह गोंदिया,चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे ६०० राईस मिल बंद अवस्थेत…..-इतर राज्यांप्रमाणे दर ठरवण्याची राईस मिल मालकांची मागणी…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके 

गडचिरोली :- सध्याच्या घडीला गडचिरोली जिल्ह्यासह गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे ६०० राईस मिल बंद आहेत.अशातच यावर्षी शासनाने शेतकऱ्यांकडून कोट्यवधी क्विंटल धान खरेदी केले आहे.मात्र खरेदी करण्यात आलेला धान उघड्यावर पडून आहेत.राईस भरडाई करण्यास तयार नसल्याने धान्याची नासाडी होत आहे.राईस मिल बंद असल्याने मजूर,वाहतूकदार आणि गिरण्यांशी संबंधित नागरिक बेरोजगार होऊन उपासमारीची पाळी अनेकांवर आली आहे.अशातच स्थानिक तसेच इतर नागरिकांना रोजगाराभिमुख जास्तीत-जास्त रोजगार देणारा गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यात फक्त तांदूळ उद्योग आहे; अशा परिस्थितीत सरकारने यावर तोडगा  लवकरात लवकर तोडगा काढून विचार करणे आवश्यक आहे.

राईस मिल व मिलर्सची मागील ३ वर्षांची थकबाकी तसेच वाहतूक बिले शासन दरबारी प्रलंबित आहेत. त्यामुळे उद्योगा करीता बँकांकडून कर्ज घेणाऱ्या राईस मिल मालकांना आता बँका त्रास देत आहेत.त्यामुळे काही राईस मिल मालकांना कर्जपायी आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरलेला नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.एमएसपीमुळे संपूर्ण धान्या शासन खरेदी करते.मिलरला सदर धान गिरवावा लागतो आणि सरकारला तांदूळ द्यावा लागतो, मिलर्सने दिलेला तांदूळ रेशन दुकानातून गोर-गरीब जनतेला दिला जातो.शेजारच्या मध्य प्रदेशात २०० रुपये आणि छत्तीसगडमध्ये १२० रुपये प्रति क्विंटल दराने मिलिंग मिळते आणि महाराष्ट्रात त्याचा दर फक्त १० रुपये प्रति क्विंटल आहे.ज्यामध्ये मिलरला एक क्विंटलच्या बदल्यात ६७ टक्के तांदूळ द्यावा लागतो.धानाची हमाली,वीजबिल आणि इतर खर्च असे सरकारी नियमानुसार आहे.शेजारील राज्याप्रमाणे आम्हालाही  दर देण्यात यावा; अशी मागणी गिरणीधारक महाराष्ट्र सरकारकडे वारंवार करीत आहेत; परंतु याकडे शासन लक्ष घालीत नसल्याने महाराष्ट्र सरकारने इतर राज्यांप्रमाणे जास्तीचे दर देण्यात यावे; अशी मागणी महेश अग्रवाल,आकाश अग्रवाल,दिशुलाल काबरा आणि इतर राईस मिलर्स करीत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!