Saturday, July 25, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्ततर….'या' कारणामुळे होणार शिधापत्रिका रद्द अन् रेशन बंद…

तर….’या’ कारणामुळे होणार शिधापत्रिका रद्द अन् रेशन बंद…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-ज्यांना रेशनची आवश्यकता आहे; अशांना रेशन मिळत नाही; तर बरेचसे रेशन मिळण्यासाठी अपात्र असूनही रेशन उचलतांना दिसून येत आहेत.अशातच आता राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमातील तरतुदीनुसार जे कार्डधारक आयकर भरतात,त्यांना मोफत रेशन मिळत असलेली शिधापत्रिका रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.त्याचे चोख पालन करत शासनस्तरावरून पाठविण्यात आलेल्या यादीतील शिधापत्रिका प्राधान्याने रद्द करण्याची कार्यवाही पुरवठा विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. उत्पन्न अधिक असलेल्या कार्डधारकांनी रेशनवरील धान्य सोडून देणे हिताचे ठरणार आहे.

कायद्यानुसार,जे लोक आयकर भरतात,त्यांना शासनस्तरावरून पुरविण्यात येणारे मोफत रेशन घेता येत नाही.याशिवाय ज्यांच्याकडे दहा एकरांपेक्षा अधिक शेतजमीन आहे.अशा मंडळींनाही मोफत धान्य दिले जाऊ नये; असे शासनाचे निर्देश आहेत. दरम्यान,अशा लोकांची यादी तयार करून ती त्या-त्या जिल्ह्याकडे यापूर्वीच शासनाने पाठविली आहे.त्यात नमूद लोकांचे धान्य मिळणारे कार्ड रद्द करून संबंधितांना पांढरी शिधापत्रिका देण्याची कार्यवाही केली जात आहे.

ज्यांनी चार महिन्यांपेक्षा कालावधीपासून स्वस्त धान्य दुकानदाराकडे जाऊन धान्याची मागणी केलेली नाही तसेच आधार लिंक केले नाही; अशा लाभार्थ्यांचेही कार्ड रद्द होणार आहे.वार्षिक उत्पन्न तीन लाखांपेक्षा अधिक असल्यास मोफत रेशन घेण्याचा अधिकार राहत नाही.जे लोक आयकर भरतात,ते मोफत धान्य घेण्यास अपात्र असून,संबंधितांचे कार्ड रद्द केले जात आहे.एखादा शिधापत्रिकाधारक आयकर भरत असूनही ते स्वस्त धान्याचा लाभ घेत असेल किंवा धान्याची उचल करत असेल आणि त्यांनी कार्ड पुरवठा विभागाकडे वापस केले नसेल तर सरकार त्या व्यक्तीकडून २७ रुपये प्रति किलोप्रमाणे धान्याची किंमत वसूल करू शकते.अपात्र ठरल्यापासून केलेल्या धान्याच्या उचलीची रक्कम वसुली केली जाते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘डायल ११२’ वर खोटी माहिती देत असाल तर सावधान; कारावासासह दंडाची शिक्षा.. – खोटी माहिती दिल्याने तरुणावर गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :- 'डायल ११२' हा भारत सरकारचा आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक आहे.याद्वारे आपत्कालीन परिस्थितीत पोलिस व इतर काही महत्त्वाच्या सेवा एकाच नंबरवर जलद...

गडचिरोली जिल्ह्यात तिरंदाजी खेळाचे प्रशिक्षण केंद्र; आष्टी येथे खेळाडू निवड चाचणीचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र शासनाच्या क्रीडा मंत्रालयामार्फत खेलो इंडिया आर्चरी प्रशिक्षण केंद्र(आष्टी)अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात आर्चरी(तिरंदाजी)खेळाचे प्रशिक्षण केंद्र मंजूर करण्यात आले आहे.या केंद्रात ३० प्रशिक्षणार्थी...

लाडक्या बहिणींची अंतिम लाभार्थी यादी जाहीर; ८० लाखाहून अधिकच्या महिलांचे दीड हजार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :- 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेची अंतिम लाभार्थी यादी निश्चित करण्यात आली असून राज्यातील १ कोटी ६६ लाख २८ हजार ४८ महिला योजनेसाठी...

दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा होणार गौरव; राष्ट्रीय पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती,दिव्यांग व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यासाठी भारत सरकारच्या दिव्यांगजन सशक्तीकरण विभागामार्फत दरवर्षी ३ डिसेंबर रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!