Thursday, September 10, 2026
Homeगडचिरोलीतक्रारदारांनी लोकशाही दिनात अर्ज सादर करण्याचे आवाहन..

तक्रारदारांनी लोकशाही दिनात अर्ज सादर करण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्हास्तरावरील लोकशाही दिन येत्या, १ सप्टेंबर २०२५ (सोमवार)रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांनी आपल्या तक्रारी मांडण्यासाठी या उपक्रमाचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
तक्रार अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया👇
ज्या तक्रारदारांना जिल्हास्तरावरील लोकशाही दिनात आपला अर्ज सादर करायचा आहे,त्यांनी खालील बाबींचे पालन करणे आवश्यक आहे:तक्रारदाराने आपली समस्या प्रथम तालुका स्तरावरील लोकशाही दिनात सादर करणे अपेक्षित आहे.जर त्या स्तरावरील तहसिलदारांकडून प्राप्त उत्तरावर समाधान झाले नाही,तर त्या उत्तराची प्रत तसेच तालुका लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाची प्रत अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे.अर्ज प्रपत्र-१(ब) या विहित नमुन्यात भरून,अर्जाची एक आगाऊ प्रत जोडून लोकशाही दिनाच्या १५ दिवस आधी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे.तक्रार/निवेदन हे केवळ वैयक्तिक स्वरुपाचे असावे.सामूहिक किंवा सर्वसाधारण स्वरुपाच्या तक्रारी विचारात घेतल्या जाणार नाहीत,असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धरणात बुडालेल्या तरुण शेतकऱ्याचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बैल पोळा सणाच्या एक दिवसापूर्वी धरण परिसरात बैल धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना काल,बुधवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या...

सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन,वारसा हक्क,पदोन्नती व निवासाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा- राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यामुळे त्यांच्या वेतन,सेवा,आरोग्य, निवास व आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा...

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये उत्तम मूल्यसंस्कार रुजविणे काळाची गरज-शिक्षणमंत्री दादाजी भुसे – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत आज विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी.. – पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच भावी पिढीवर राष्ट्रभक्तीचे आणि उत्तम मूल्यांचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे.गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही...

अजब लाचेची गजब कहाणी..! दोन्ही हातांच्या दहा बोटांचा इशारा करून मागितली १० हजाराची लाच.. – पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  छत्रपती संभाजीनगर :-राज्याच्या विविध भागात सरळ-सरळ तोंडी बोलणी करून अनेकजण लाच घेतांना व एसीबीच्या जाळ्यात अडकतांना दिसून येतात.पण, नुकतेच छत्रपती संभाजीनगर(पूर्वीचे औरंगाबाद)शहरात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!