Wednesday, September 2, 2026
Homeदेसाईगंजजुनी वडसा येथील ३९१ घरकुल लाभार्थ्यांना विना मूल्य पाच ब्रास रेतीचे वाटप...

जुनी वडसा येथील ३९१ घरकुल लाभार्थ्यांना विना मूल्य पाच ब्रास रेतीचे वाटप सुरू…-भाजपाचे देसाईगंज शहराध्यक्ष सचिन खरकाटे यांच्या प्रयत्नांना यश…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके 

देसाईगंज(गडचिरोली) :- सध्याच्या घडीला तसेच यापूर्वी गडचिरोली जिल्ह्याच्या अनेक तालुक्यात मोठ्या प्रमाणावर प्रधानमंत्री आवास योजना,मोदी आवास योजना,रमाई आवास योजना,शबरी घरकुल योजना तसेच इतर योजनेच्या माध्यमातून अनेक लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले.घरकुल मंजूर तर करण्यात आले; मात्र जिल्ह्यात दोन ते तीन वर्षांपासून रेती घाटांची लिलाव प्रक्रिया रखडल्याने घरकुल लाभार्थ्यांना बांधकामासाठी रेतीचा प्रश्न नेहमी भेडसावत होता.अशातच गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांकडे घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास मोफत रेतीचा मुद्धा उपस्थित केल्यानंतर जिल्ह्यातील तालुक्यात घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास विना मूल्य रेती मिळू लागली.त्यानुसार काही दिवसांपूर्वी देसाईगंज शहराचे भाजपा शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक सचिन खरकाटे यांनी देसाईगंज तहसीलचे तहसीलदार प्रीती डूडूलकर यांना शहराच्या जुनी वडसा येथील घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास विना मूल्य रेती बाबत चर्चा करून लवकरात-लवकर याचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात यावा; अशी मागणी केली. त्यानुसार तहसीलदार यांनी विलंब न लावता जुनी वडसा येथील ३९१ घरकुल लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच ब्रास विना मूल्य रेती मंजूर करण्यात आली.त्यानुसार आज दिनांक-१५ जून ला जुनी वडसा येथील  लाभार्थ्यांना वैनगंगा नदी घाटातून विना मूल्य पाच ब्रास रेतीचे वाटप करण्यात येत आहे.सचिन खरकाटे यांनी मागणी केलेल्या प्रयत्नांना यश आल्याने गावातील घरकुल लाभार्थ्यांनी त्यांचे आभार मानले आहे.

गावातील लाभार्थ्यांना पाच ब्रास विना मूल्य रेतीचे वाटप करतेवेळी भारतीय जनता पक्षाचे देसाईगंज शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक सचिन खरकाटे, गावातील पोलीस पाटील अविकांत बोदले,कोतवाल आशुतोश हेडाऊ,रमेश सहारे,ताराचंद पत्रे,ताजुल उके, अधिकनाथ कांबळे व गावकरी उपस्थीत होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!