Friday, September 4, 2026
Homeगोंदियागुंडास 'धोकादायक व्यक्ती' ठरवून एक वर्षासाठी केले कारागृहात स्थानबद्ध.. - गोर गरीब...

गुंडास ‘धोकादायक व्यक्ती’ ठरवून एक वर्षासाठी केले कारागृहात स्थानबद्ध.. – गोर गरीब कामगारांसह सर्वसामान्य नागरिकांची करायचा लुटमार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-शहर तसेच परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीविरोधात पोलिसांनी वेळोवेळी गुन्हे दाखल करून प्रतिबंधक कारवाया केल्या. पण,त्याच्या वागणुकीत जराही सुधारणा झाली नाही. परत,पुन्हा त्याच मार्गावर जाऊन रात्री-अपरात्री हातात घातक शस्त्रे घेऊन गोर गरीब कामगारांसह सर्वसामान्य नागरिकांना धमकावून लुटमार करणे,अवैध शस्त्र बाळगणे,शासकीय सेवकांवर हल्ला करणे व इतर विविध प्रकारची दहशत पसरवून लोकांचे जगणे कठीण करून सोडल्याने गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी कठोर निर्णय घेत त्यास ‘धोकादायक व्यक्ती’ ठरवून वाशिम कारागृहात एक वर्ष ठेवण्याचे आदेश निर्गमित केले आहे.संदेश मधुकर खोब्रागडे वय ४५ वर्षे,रा.कुडवा, ता.जि.गोंदिया असे कारवाई करण्यात आलेल्या कुख्यात गुंडाचे नाव असून त्याच्यावर गोंदिया शहर व रामनगर परिसरातील पोलीस ठाण्यात तब्बल १२ गंभीर गुन्हे दाखल आहेत.त्यामुळे महाराष्ट्र प्रतिबंधक कायदा (एम.पी.डी.ए.)अधिनियम १९८१(सुधारीत २०१५) अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हा पोलिस  प्रशासनाने जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला होता.सदरची कारवाई गोंदिया जिल्हा पोलिस अधीक्षक गोरख भामरे,अप्पर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे,उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी बनकर व साहिल झरकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

मोहफुलाची दारू नाही; तर पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहफुलांचा अवैध मद्यनिर्मितीसाठी होणारा वापर रोखून त्यापासून पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्याची सक्षम मूल्यसाखळी जिल्ह्यात उभारावी.महिला बचत गटांना...

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!