Friday, June 19, 2026
Homeदेसाईगंजगरीब नवाज रिलीफ फाऊंडेशनच्या वतीने महारक्तदान शिबिर संपन्न... - शिबिरात ७१ रक्तदात्यांनी...

गरीब नवाज रिलीफ फाऊंडेशनच्या वतीने महारक्तदान शिबिर संपन्न… – शिबिरात ७१ रक्तदात्यांनी केले रक्तदान..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या कमलानगर येथे ईद-ए-मिलादून्नबी दिनाचे औचित्य साधून गरीब नवाज रिलीफ फाऊंडेशन तर्फे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सदर शिबिरास रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत शिबिरात ७१ रक्तदात्यांनी रक्तदान करीत एकप्रकारे सामाजिक बांधिलकी जपली आहे.
गरीब नवाज रिलीफ फाऊंडेशन नेहमी समाजोपयोगी उपक्रम राबवित असतात.देशावर येणाऱ्या संकटकाळी गरीब नवाज रिलीफ फाऊंडेशन नेहमी एक पाऊल पुढे घेऊन लोकांची मदत करीत आहेत.
कोरोना महामारीच्या काळात गरीब नवाज फाऊंडेशनच्या वतीने ऑक्सिजन पुरवठा असो किंवा लावारीस मृतदेहांचा अंत्यसंस्कार असो सदर फाऊंडेशनच्या वतीने नेहमी चांगली कामे केली जातात.गरीब नवाज रिलीफ फाऊंडेशनच्या वतीने
या पंढरवड्यात देशात विविध ठिकाणी वृक्षारोपण आणि रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
देसाईगंज या ठिकाणी झालेल्या महारक्तदान शिबिरास डॉ.आशिष कोरेटी,इलियास खान,  बुल्ले,हाजी खलील खान,हाजी एजाज खान,फैझान पटेल,वहीद शेख आदी प्रामुख्याने उपस्थितीत होते सदर शिबिराच्या यशस्वीतेसाठी गरीब नवाज रिलीफ फाऊंडेशन चे पदाधिकारी मो.आमिर यासिनी,जाफर शेख,फराज पठाण,शाकिब शेख,गाझी शेख,मोहनीश शेख,अबरार शेख,कलीम मिर्झा,अफझल शेख,आदींनी परिश्रम घेतले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!