Wednesday, August 5, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यातील धान्य घोटाळे बाजांना दणका -तब्बल ४१ राईसमिल धारकांवर करोडो रुपयांचा...

गडचिरोली जिल्ह्यातील धान्य घोटाळे बाजांना दणका -तब्बल ४१ राईसमिल धारकांवर करोडो रुपयांचा दंड…- देसाईगंज तालुक्यातील सर्वाधिक राईस मिल मालकांचा समावेश….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- गडचिरोली जिल्हा अन् भातावर भिडला असे उगेचच म्हटले जात नाही; कारण की जिल्ह्यातील साधन संपत्तीची वाट लावायची असो वा गोरगरिबांच्या हक्काची शिदोरी असो; जो-तो शासनास नाही तर आम जनतेच्या खिशाला कात्री लावून स्वतःची पोळी शेकण्यात महत्वाची भूमिका बजावतांना दिसून येतात.आपण नेहमीच गृहीत धरतो की,जेवढा पॉश एरिया तेवढीच होणारी लय-लूट कमी; मात्र हल्ली काळानुरूप बदल होऊन जेवढा पॉश एरिया तेवढाच झांगडगुत्ता होत असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. काही महिन्यांपूर्वी गोंदिया व भंडारा जिल्ह्यामध्ये धान्य घोटाळे उघडकीस येऊन मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली. महत्वाचे म्हणजे ‘सापडला तो चोर नाहीतर शिरजोर’… असाच प्रकार शासनाची दिशाभूल करीत धान घोटाळ्याचे प्रकरण उजेडात येताच संबंधित राईस मिल मालकांच्या लॉबीने मोठमोठ्या राजकीय नेत्यांची भेट घेऊन प्रकरण शांत करण्याचा बराच आटापिटा केला होता.परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.त्यामुळे झांगडगुत्ता करणे भोवले आहे.आधारभूत खरेदी योजनेंतर्गत भरडाईकरिता उचल केलेल्या धानाची जिल्ह्याबाहेर परस्पर विक्री करुन त्याऐवजी बाजारातून निकृष्ट दर्जाचा तांदूळ खरेदी करुन,शासकीय गोदामात जमा करुन,आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी जिल्ह्यातील ४१ राईसमिल मालकांवर २.६८ कोटींचा दंड ठोठावला आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी घोटाळेबाजांना दिलेल्या दंडात्मक दणक्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. संचालकांनी चौकशी समिती नेमून ४१ राईस मिल मालकांकडे उपलब्ध दस्तऐवजांची तपासणी केली होती.त्यावेळी या राईसमिल मालकांनी संगनमत करुन गंभीर अनियमितता व आर्थिक गैरव्यवहार केल्याची बाब व्यवस्थापकीय संचालकांना आली होती.त्यानंतर संचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांना संबंधित राईस मिल मालकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.शिवाय या प्रकरणी गडचिरोली येथील आदिवासी विकास महामंडळाच्या तत्कालिन व्यवस्थापकास निलंबितही करण्यात आले.

त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित राईस मिल मालकांना कारणे दाखवा नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितले होते.परंतु राईस मिल मालकांनी सादर केलेले स्पष्टीकरण असमाधानकारक होते.शिवाय पुराव्यादाखल त्यांनी कोणेतेही दस्तऐवज सादर केले नाही.त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांवर दंड ठोठावला आहे.हा दंड एकरकमी वसूल करण्यात येणार आहे.जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी धान घोटाळा प्रकरणी जिल्हाभरातील ४१ राईस मिल मालकांवर तब्बल २.६८ कोटी रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे.यात देसाईगंज तालुक्यातील सर्वाधिक राईस मिल मालकांचा समावेश असल्याची माहिती आहे.जिल्ह्यातील धान घोटाळे बाजांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावी; अन्यथा उपोषणाचा पावित्रा घेतला जाणार असल्याचे सुज्ञ नागरिकांकडून सुर निघू लागले आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाचा हल्ला; एकाचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांचे सत्र काही केल्या थांबेना.मानव वाघांच्या दडित जातो की,वाघ मानवांच्या दडित येतो,हेच कळेनासे झाले आहे.हल्ली मानवाची केवळ किंमत ठरवली जात...

बापरे..!अंतिम संस्काराची तयारी सुरू असतांनाच मृतक व्यक्तीने उघडले डोळे..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्यात एक अचंभित करणारी घटना काल मंगळवारी उघडकीस आली.एका ४० वर्षीय व्यक्तीची प्रकृती अचानक खालावल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल...

ऑगस्ट महिन्यापासून गॅस कनेक्शनची ई-केवायसी असणे बंधनकारक; अन्यथा कनेक्शन होणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त :-गॅस सिलिंडरचा काळाबाजार थांबवण्यासाठी आणि साठेबाजी उघड करण्यासाठी केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील गॅस कंपन्या इंडेन, एचपी आणि भारत गॅसच्या ग्राहकांसाठी स्वयंपाकाच्या...

आता बनावट किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे जातवैधता प्रमाणपत्र तयार करणे पडणार महागात..

उद्रेक न्युज वृत्त :-बरेचदा जातवैधता प्रमाणपत्र अर्थात कॉस्ट व्यालीडिटी सर्टिफिकेट बनावट किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे बनवून शासकीय योजनांचा लाभ मिळवणे,शासकीय नोकरी,अभियांत्रिकी प्रवेश व इतर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!