Sunday, May 31, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली उपप्रादेशिक परिवहन विभागाची धडक कारवाई.. -सात स्कूल व्हॅन जप्त; १ लाख...

गडचिरोली उपप्रादेशिक परिवहन विभागाची धडक कारवाई.. -सात स्कूल व्हॅन जप्त; १ लाख २५ हजाराचा दंड..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत उपप्रादेशिक परिवहन विभाग गडचिरोलीच्या पथकाने आज,शनिवार ५ जुलै रोजी शहरात बेकायदेशीरपणे कार्यरत असलेल्या सात स्कूल व्हॅनवर धडक कारवाई केली.कारवाईत विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर एकूण १ लाख २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.गडचिरोली शहरातील विविध भागांमध्ये बेकायदेशीर स्कूल व्हॅन संदर्भात मिळालेल्या तक्रारींच्या आधारे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने तपासणी मोहीम राबवली.यामध्ये अनेक व्हॅनकडे वैध परवाना नसणे,विमा व फिटनेस कागदपत्रांची मुदत संपणे, विद्यार्थ्यांची क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणे व इतर कागदपत्रे नसल्याचे आढळून आल्याने मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली असून पुढील तपासणी सुरू आहे.
  • विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शिस्तबद्ध वाहतूक आवश्यक- किरण मोरे,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी👇  
विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही आमची प्राथमिकता आहे. त्यामुळे अशा बेकायदेशीर वाहतूक व्यवस्थेला मुळापासून रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल.
  • शाळांना व पालकांना आवाहन👇
मोरे यांनी सर्व शाळा व्यवस्थापन आणि व्हॅन चालकांना त्यांच्या कागदपत्रांची व वाहनांची नियमित तपासणी करून ती वैध ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच पालकांनी आपल्या मुलांसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांची सुरक्षा व परवाने तपासून ते योग्य असल्याची खात्री करण्याचेही आवाहन त्यांनी केले आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत अजून तपासण्या आणि वाहतूक सुरक्षेसंदर्भात जनजागृती मोहिमा राबवण्यात येणार आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

हाताची दोन बोटे दाखवून सेल्फी काढत असाल तर सावधान..!

उद्रेक न्युज वृत्त :-डिजिटल युगात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होतांना दिसून येत आहे.काही कालावधीपासून डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून नागरिकांची लाखो रुपयांपासून ते कोट्यवधी रुपयांची फसवणूक...

‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ व ‘उच्चरक्तदाब दिना’ निमित्त पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' आणि 'जागतिक उच्चरक्तदाब दिना'चे औचित्य साधून गडचिरोली येथे एक विशेष आरोग्य जनजागृती आणि तपासणी शिबिर उत्साहात पार...

कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा; स्वतःचीच दोन मुले विकली दोन लाखात.. – अल्पवयीन मुलीसोबत भयंकर कृत्य..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-काही कालावधीपासून चंद्रपूर जिल्ह्यात खतरनाक कारनामे उघडकीस येऊ लागलेत.विविध कारनामे उघड होत असतांनाच नुकताच एका कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा...

आदिवासी महामंडळाच्या नियोजनशून्यतेमुळे शेतकरी संकटात; रब्बीची धान खरेदी केंद्रे अद्याप बंदच.. – गोदामे जुन्याच धानाने गच्च भरलेली..

उद्रेक न्युज वृत्त  गौरव नागपूरकर/देसाईगंज :-रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी आदिवासी विकास महामंडळाची खरेदी केंद्रे अद्याप सुरू न झाल्याने देसाईगंज(वडसा)परिसरासह गडचिरोली जिल्ह्यातील हजारो शेतकरी तीव्र चिंतेत सापडले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!