Sunday, September 6, 2026
Homeकोंढाळाकोंढाळा येथील प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक महादेव दोनाडकर यांचे दिर्घ आजाराने निधन..

कोंढाळा येथील प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक महादेव दोनाडकर यांचे दिर्घ आजाराने निधन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथील प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक महादेव दोनाडकर वय ५७ वर्षे यांचे काल,मंगळवारी १० डिसेंबरला ब्रम्हपुरीच्या खाजगी रुग्णालयात दुपारी ३ वाजेच्या सुमारास उपचारा दरम्यान दिर्घ आजाराने निधन झाले.
मृदभाषी,शांत,संयमी,लोकांना आपलेसे करणे,असा त्यांचा मूळ स्वभाव.कोंढाळा गावातील मुख्य चौकात दोनाडकर यांचे हॉटेल तसेच भांडे विक्रीचा व्यवसाय आहे.दोनाडकर यांना लहानपापासूनच व्यवसायाची आवड होती.त्यामुळे त्यांनी स्वतःला व्यवसायात झोकून दिले होते.अशातच त्यांना मधुमेह आजाराने ग्रासले.आजारपणातही ते काहीकाळ दुकानात घालवायचे.गावातील नागरिक सांगतात की,शेवटपर्यंत त्यांनी कुणाशीही तंटे वा भांडण केलेले नाही.महादेव दोनाडकर यांना मधुमेह (शुगर)आजाराने ग्रासाल्याने त्यांच्यावर बऱ्याच दिवसांपासून ब्रम्हपुरी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.अशातच काल मंगळवारी त्यांची प्रकृती खालावली व दुपारच्या सुमारास वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मावळली.त्यांच्या पश्चात पत्नी,नातवंडं,भाऊ व बराच मोठा आप्त परिवार आहे.
आज,बुधवारी ११ डिसेंबरला सकाळच्या सुमारास महादेव दोनाडकर यांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम पार पाडण्यात येणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!