Monday, August 31, 2026
Homeगडचिरोलीकुरखेडा-कोरची मार्गावरील वाहतूकीत बदल..-पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आदेश..

कुरखेडा-कोरची मार्गावरील वाहतूकीत बदल..-पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आदेश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- राष्ट्रीय महामार्ग क्र.५४३ वरील कुरखेडा ते कोरची दरम्यान सती नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम सुरू आहे.सदर काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे शक्य नसून सदर पुलाची वाहतूक तात्पुरत्या स्वरुपात बांधण्यात आलेल्या वळण मार्गावरुन वळती करण्यात आले आहे.परंतु हा वळणमार्ग पावसामुळे क्षतीग्रस्त होवू शकतो किंवा पूराच्या पाण्याखाली येऊन वाहतूक बंद होऊ शकते. त्यामुळे पावसाळ्यात संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी या मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक २९ जून पासून ते ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत वळती करण्याचे आदेश जिल्हाधिकारी संजय दैने यांनी निर्गमित केले आहे.

पर्यायी मार्ग म्हणून नागरिकांनी हलक्या स्वरुपाची वाहनांकरिता कुरखेडा-चिचटोला फाटा-आंधळी-वाघेडा-मालदुगी-गोठणगाव फाटा मार्ग (रा.म.क्र.५४३) या रस्त्याचा तसेच जड वाहतुकीकरिता कुरखेडा-वडसा-आरमोरी-वैरागड मार्ग (रा.म. क्र.३६३)- गोठणगाव फाटा मार्ग (रा.म.क्र.५४३) या पर्यायी मार्गाचा वापर करावा.

अंमलबजावणी न करणाऱ्‍या वाहतुकदार किंवा व्यक्तीविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्याचे अधिकार स्थानिक पोलीसांना असेल; असेही जिल्हाधिकारी यांचे आदेशात नमुद करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ई-पीक पाहणी नोंद घेणाऱ्यांकडून पैश्याची मागणी; तहसील कार्यालयात करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत बदल करून गावनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पिकांची नोंद करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,शासकीय योजना,पीक कर्ज...

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!