- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-वाहने हळू चालवा..! असे रस्त्याच्या कडेला असलेल्या फलकांवर लिहिलेले आपण अनेकदा बघितले व वाचत असतो.मात्र,त्याचे पालन न करण्याची जणूकाही आम्ही लोकांनी शपथच घेतली की काय? असा प्रश्न निर्माण होतो.काही जणांना सुसाट वाहने चालविण्याची सवय जडलेली असते,तर काहींना मोठी घाई असते.त्यामुळे दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण अधिकच वाढले आहेत.
ओव्हरटेक करतांना भरधाव ट्रकने मोटारसायकलला कट मारला त्यामुळे दुचाकीवरील दाम्पत्य रोडवर कोसळून पत्नीचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर पती व मुलगा जखमी झाल्याची घटना रामटेक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जबलपूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील मनसर ता.रामटेक परिसरात काल बुधवारी २५ डिसेंबरला सकाळच्या सुमारास घडली.
राणू लंकेश बिसेन वय २८ वर्षे असे मृत पत्नीचे नाव आहे.तर जखमींमध्ये पती लंकेश बिसेन वय ३२ वर्षे व मुलगा हिमांशू बिसेन वय ११ वर्षे या दोघांचा समावेश आहे.बिसेन दाम्पत्य कटंगी,जिल्हा बालाघाट,मध्य प्रदेश येथील मूळ रहिवासी आहेत.तिघेही त्यांच्या एमएच ४९ बीवाय १९५९ क्रमांकाच्या मोटारसायकलने कटंगीहून मनसर मार्गे नागपूरला जात होते.पती लंकेश दुचाकी चालवित होता तर राणू व हिमांशू मागे बसले होते.मनसर परिसरातील रामधामजवळ मागून वेगात आलेल्या ट्रकने त्यांच्या मोटारसायकलला ओव्हरटेक करतांना कट मारला. त्यामुळे लंकेशचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने तिघेही रोडवर जोरात कोसळले.यात राणूच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा काही वेळात घटनास्थळीच मृत्यू झाला.इतर दोघांना तुलनेत कमी दुखापत झाली.अपघात होताच ट्रकचालक ट्रकसह घटनास्थळाहून पळून गेला.माहिती मिळताच ठाणेदार आसाराम शेटे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठून पंचनामा केला.त्यांनी दोन्ही जखमींना उपचारासाठी तर राणूचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रामटेक शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.घटने प्रकरणी रामटेक पोलिसांनी अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
- Advertisement -

