Sunday, August 9, 2026
Homeछत्रपती संभाजी नगरउद्यापासून दहावी बोर्डाचे प्रवेशपत्र मिळणार…-दहावीची बोर्डाची परीक्षा १ ते २६ मार्च दरम्यान 

उद्यापासून दहावी बोर्डाचे प्रवेशपत्र मिळणार…-दहावीची बोर्डाची परीक्षा १ ते २६ मार्च दरम्यान 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

छत्रपती संभाजीनगर :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे प्रवेशपत्र (हॉल तिकीट) विद्यार्थ्यांना उद्या म्हणजेच बुधवारपासून दिनांक- ३१ जानेवारी रोजी माध्यमिक शाळांमध्ये मिळणार आहेत.दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या शाळांमार्फत ही प्रवेशपत्र मिळणार आहेत;अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव (पुणे) अनुराधा ओक यांनी दिली.

राज्य मंडळातर्फे माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच दहावीची बोर्डाची परीक्षा १ मार्च ते २६ मार्च दरम्यान होत आहे.तसेच,दहावीची प्रात्यक्षिक,श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा १० फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.या परीक्षेसाठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात येत आहे.

सर्व माध्यमिक शाळांना मार्च २०२४ च्या परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर उद्या, बुधवारपासून ‘स्कूल लॉगिन’मध्ये डाउनलोड करून घेण्याची सोय उपलब्ध होणार आहे.काही तांत्रिक अडचण उद्‌भवल्यास माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा; असे आवाहन राज्य मंडळाने केले आहे.

दहावीच्या परीक्षेसाठी सर्व माध्यमिक शाळांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेशपत्रे प्रिंट करून द्यायची आहेत.प्रवेशपत्र ऑनलाइन पद्धतीने प्रिंट करून देताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेण्यात येऊ नये.संबंधित प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी.तसेच, विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रामध्ये विषय, माध्यम बदल असतील, तर त्यांच्या दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्याव्यात. त्याचप्रमाणे प्रवेशपत्रावरील छायाचित्र, स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव, जन्मतारीख, जन्मस्थळ या संदर्भातील दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी करून त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे पाठवावी; अशा सूचना आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या दाखल गुन्ह्यात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी व तिच्यासोबत असलेल्या संशयित आरोपीचा शोध घेण्यात अनैतिक...

रेल्वेची जोरदार धडक; बिबट्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा वनपरिक्षेत्राच्या मूर्ती वनक्षेत्रातून गेलेल्या दक्षिण मध्य रेल्वेच्या बल्लारशाह-काजीपेठ रेल्वे मार्गावरील कक्ष क्रमांक-५९० मधील पोल क्रमांक १५२/२६ नजिक एका नर बिबट्याचा रेल्वेच्या...

ऑनलाईन केवायसीच्या नावाखाली डॉक्टरची साडेसात लाखांची फसवणूक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका अज्ञात सायबर चोरट्याने ऑनलाईन केवायसीच्या नावाखाली डॉक्टरची तब्बल साडेसात लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला. डॉ.राघवेंद्र...

एकेकाळी ज्या भागात फडकायचे लाल,काळे झेंडे; आता पहिल्यांदाच फडकणार तिरंगा..

उद्रेक न्युज वृत्त :-देशातील नक्षलवादाची संपूर्ण मुळे ३१ मार्च २०२६ पर्यंत उपटून फेकण्यात येणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर करताच राज्याच्या विविध जिल्ह्यातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!