Friday, July 17, 2026
Homeदेसाईगंजआज रामदास मसराम यांच्या नेतृत्वात देसाईगंज येथे शेतकऱ्यांचा ठिय्या व चक्काजाम आंदोलन….

आज रामदास मसराम यांच्या नेतृत्वात देसाईगंज येथे शेतकऱ्यांचा ठिय्या व चक्काजाम आंदोलन….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज (गडचिरोली) :- सन २०१३-२४ मधील खरीप हंगामातील धान पीक अतिवृष्टीमुळे पुर्णतः उद्धवस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांना सावकारांकडून व बँकेकडून घेतलेले कर्ज फेडणे दुरापस्त झाले आहे. तो खर्च भरून निघावा म्हणून शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात भाताची लागवड केली आहे. परंतु शिंदे-फडणवीस सरकार ने फक्त ८ तास विज पुरवठा करण्याचा कठोर निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांना हातातोंडाशी आलेला घास हे सरकार हिराऊन घेत आहेत.दि.१३ फेब्रुवारला केलेल्या आंदोलनामुळे १२ तास विज पुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते परंतु अद्यापही १२ तास विज पुरवठा करण्यात येत नसल्यामुळे आज,दि.२६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.०० वाजता स्थानिक उपविभागीय अधिकारी तथा तालुका दंडाधिकारी कार्यालयावर सामाजिक कार्यकर्ते रामदास मसराम यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा ठिय्या आंदोलन व शेतकऱ्यांचे प्रतिनिधी श्याम मस्के यांचे आमरण उपोषण तसेच आरमोरी-गडचिरोली मार्गावर भव्य चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.तरी परिसरातील शेतकऱ्यांनी सदर आंदोलनात जास्तीत-जास्त संख्येंनी सहभाग घेऊन आपल्या न्याय मागणीला सहकार्य करावे असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते रामदास मसराम व अन्य शेतकऱ्यांनी केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महामार्गाच्या मध्यभागी आलेले पाणीपुरवठा योजनेचे चेंबर धोकादायक; संबंधित विभागाचे दुर्लक्ष.. – रविंद्र गोटेफोडे यांची तातडीने स्थलांतराची मागणी

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा शहरातून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४३ च्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे चेंबर थेट रस्त्याच्या मध्यभागी आल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला...

सर्पदंश झाल्यास काय करावे आणि काय करू नये,घ्या जाणून.. – गडचिरोली जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत एकूण १३४ सर्पदंशाच्या घटनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पावसाळ्याच्या दिवसांत शेतीची कामे वाढल्यामुळे आणि बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे सापांचा मानवी वस्तीत व शेतात वावर वाढतो.गडचिरोली जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र व जंगलाचे...

शिवराजपूर येथे रस्ता दुतर्फा वृक्ष लागवडीच्या कामास प्रारंभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- “सामुहिक वन हक्क क्षेत्र विकास हीच आमची आस,गावातील लोकांना गाव शिवारातच लावू रोजगाराची कास" या उद्देशाने देसाईगंज तालुक्याच्या शिवराजपूर येथील सामुहिक वन...

बापरे..! घराबाहेर उभ्या असलेल्या चिमुकलीवर मोकाट कुत्रे तुटून पडली..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-बऱ्याच ठिकाणच्या शहरात तसेच ग्रामीण भागात मोकाट कुत्र्यांची मोठी फौज पाहायला मिळते. काही मोकाट कुत्रे हल्ल्यांपासून चार हात दूरच असतात, तर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!