Tuesday, August 18, 2026
Homeनागपूरआजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात; अधिवेशनात मांडली जाणार वीस विधेयके

आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात; अधिवेशनात मांडली जाणार वीस विधेयके

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-हिवाळी अधिवेशनाला आजपासून म्हणजेच १६ डिसेंबर पासून सुरुवात होत आहे.सुरू होत असलेल्या अधिवेशनात वीस विधेयके मांडली जाणार आहेत.राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.मागील सरकारने काढलेल्या अनेक अध्यादेशांचे कायद्यात रूपांतर करण्याचे काम या अधिवेशनात केले जाईल,असे ते म्हणाले.
दरम्यान,हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे.संख्या कमी असूनही सरकारला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडणार नसल्याचे संकेत विरोधकांनी दिले आहेत.हिवाळी अधिवेशन केवळ सहा दिवस आयोजित केल्याने विरोधकांनीही नाराजी व्यक्त केली आहे.ही नाराजी सभागृहातही दिसून येण्याची शक्यता आहे.दुसरीकडे, विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यातून विरोधक अद्याप बाहेर येऊ शकलेले नाहीत,याचे संकेत त्यांच्या पत्रकार परिषदेतच दिसून आले. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड हे हिवाळी अधिवेशनाला पावसाळी अधिवेशन म्हणाले, तसेच पत्रपरिषदेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार या दोघांच्याही चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता.दुसरीकडे, सरकारनेही सभागृहात विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अज्ञात चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; पतीचा मृत्यू,पत्नी गंभीर जखमी.. – देसाईगंज-आरमोरी मार्गावरील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज-आरमोरी मार्गावर जणूकाही अपघातांच्या मालिकांचे सत्र सुरू झाले की काय?अशी स्थिती निर्माण झाली आहे.नुकताच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ रोजी देसाईगंज-आरमोरी मार्गावरील कुरुड...

अल्पवयीन मुलाने शाळकरी मुलाची केली हत्या..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-भंडारा शहरातून आज,मंगळवार १८ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून एका शाळकरी मुलाच्या हत्येने संपूर्ण शहर हादरून...

सर्पदंश घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या वारसांना आणखी प्रत्येकी ५ लाखांचे अर्थसहाय्य मंजूर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या तीन विद्यार्थिनींच्या कायदेशीर वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी ५...

नामांकित शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल; पोलिस यंत्रणा सतर्क.

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपुरातील नामांकित शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल आज,मंगळवार १८ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास शाळांच्या अधिकृत ई-मेल आयडीवर दिसून येताच शिक्षण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!