Saturday, May 2, 2026
Homeमुंबईअफझल खानला मारताना वापरलेली वाघनखे लवकरच येणार भारतात- सुधीर मुनगंटीवार

अफझल खानला मारताना वापरलेली वाघनखे लवकरच येणार भारतात- सुधीर मुनगंटीवार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुंबई :- छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानला मारताना वापरलेली वाघनखे लवकरच भारतात येणार आहे.या संदर्भात असलेला आचारसंहितेचा अडथळा दूर झाला असून, जुलै महिन्यात वाघनखे भारतात आणण्यात येतील, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी दिली. लंडन येथील ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम’मध्ये असलेली ही वाघनखे तीन वर्षांसाठी भारतात आणली जाणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे महाराष्ट्रात आणण्यासाठी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काही दिवसांपूर्वीच ब्रिटनसोबत सामंजस्य करार केला होता.चार जूनला वाघनखे भारतात येणे अपेक्षित होते.मात्र, आचारसंहितेमुळे त्यात अडथळे आले.आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आली असून, ही वाघनखे भारतात आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.लवकरच या संदर्भातील अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

वाघनखे सातारा,कोल्हापूर आणि नागपूर येथील संग्रहालयांत एक-एक वर्षासाठी ठेवण्याचे नियोजन आहे.वाघनखे लंडनहून मुंबई आणि तेथून थेट साताऱ्यात नेली जातील.वाघनखांसाठी साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात विशेष दालन तयार करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सौर विद्युत कुंपण योजना ही शेतकऱ्यांच्या हिताचीच; उधळपट्टीचे आरोप निराधार- कृषी विभागाचे स्पष्टीकरण

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीतून राबविण्यात येत असलेल्या सौर विद्युत कुंपण योजनेबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांतील आरोप वस्तुस्थितीला धरून नसून दिशाभूल करणारे आहेत.ही...

कोंढाळा येथे दोन दिवसांपासून बिबट्याची दहशत; दोन शेळ्यांचा पाडला फडशा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घालत एकाच दिवशी दोन शेळ्यांचा फडशा पाडून दहशत माजवली आहे.बिबट्या एवढ्यावरच थांबला नाही,तर परत दुसऱ्या दिवशीही शिकारीच्या...

लाडक्या बहिणींना मोठा झटका; लाखो महिला अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक कुटुंबांसाठी आधार देणारी व महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणारी महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने जुलै-२०२४ पासून सुरू केलेली 'मुख्यमंत्री-माझी लाडकी...

पोलीस भरतीत पात्र ठरलेले युवक-युवतीचा कुरखेडा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीत कुरखेडा शहराच्या मुस्लिम समाजातील एक युवक व एक युवती पात्र ठरले आहे.प्रथमच शहरातील मुस्लिम समाजाची युवक-युवती पोलीस दलात दाखल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!