Monday, September 7, 2026
Homeपुणेअज्ञात हल्लेखोरांनी माजी उपसरपंचाची केली हत्या..

अज्ञात हल्लेखोरांनी माजी उपसरपंचाची केली हत्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
पुणे :-धारदार शस्त्राने दिवसाढवळ्या हत्या करण्यात आल्याची घटना आज,रविवार १ डिसेंबरला दुपारच्या सुमारास पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील शिक्रापूर गावात उघडकीस आली.शिक्रापूर गावचे माजी उपसरपंच तथा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा सल्लागार दत्तात्रय बंडू गिलबिले वय ५१ वर्षे यांची अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने निर्घृण हत्या त्यांच्यानिवासस्थानाजवळच केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
शिक्रापूर येथे आज दुपारी साडे बाराच्या सुमारास दत्तात्रय गिलबिले हे दुपारच्या वेळेस आपल्या निवासस्थानाच्या आवारात खुर्चीवर बसलेले होते. अचानकरित्या अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला.हल्लेखोरांनी त्यांच्या मानेवर वार केले.त्यामुळे ते गंभीर जखमी झाले आणि रक्ताच्या थारोळ्यात पडले.त्यांच्यावर वार केल्यानंतर आरोपींनी घटना स्थळवरून पळ काढला.घडलेल्या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली.लगेच गिलबिले यांना तात्काळ पुणे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र,मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने त्यांची प्राणज्योत मावळली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या सणावर महागाईचे सावट..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकरी बांधवांच्या सुख-दुःखात वर्षभर खांद्याला-खांदा लावून राबणाऱ्या सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा बैलपोळा सण अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे.मात्र,यंदा पोळ्याच्या उत्साहावर...

मॉन्सूनचा प्रभाव कमी; आजपासून सूर्य आग ओकण्याच्या तयारीत..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-काही दिवसांपूर्वी विदर्भात सक्रिय असलेला मान्सून परतीच्या मार्गावर असल्याने आज,सोमवार ७ सप्टेंबरपासून सूर्य आग ओकून तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता प्रादेशिक...

माजी सरपंचांनाच प्रशासक म्हणून कायम ठेवण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींवर तत्कालीन सरपंच हे प्रशासक म्हणून नेमण्यात आले होते.अश्यातच माजी सरपंचांच्या सहा महिन्यांच्या काही प्रशासक पदाची...

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!