Thursday, June 4, 2026
Homeगडचिरोलीअखेर मुख्याध्यापक यांना चौकशीसाठी बुलावा.. - महात्मा गांधी उच्च विद्यालय आरमोरीचे प्रकरण..

अखेर मुख्याध्यापक यांना चौकशीसाठी बुलावा.. – महात्मा गांधी उच्च विद्यालय आरमोरीचे प्रकरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या आरमोरी शहरातील महात्मा गांधी उच्च विद्यालय आरमोरी येथील मुख्याध्यापक प्रकरण मागील काही कालावधीपासून गाजू लागले आहे.प्रकरणी भाजपाचे गडचिरोली जिल्हा सहसंयोजक पंचायत राज व ग्राम विकास विभाग पदाधिकारी कैलास जे.बगमारे यांनी विविध स्तरावर तक्रारी दाखल केल्याने चौकशीचे धाड सत्र सुरू झाले आहे.बगमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकतेच जिल्हा स्तरावर चौकशी सुरू असून परत आज,शनिवार ३१ मे रोजी महात्मा गांधी उच्च विद्यालय आरमोरी येथील मुख्याध्यापक साईनाथ अद्दलवार यांना तक्रार अर्जाचे चौकशीच्या अनुषंगाने म्हणणे मांडण्याकरीता आरमोरी पोलीस ठाण्यात बुलावा करण्यात आला आहे.
  •                     प्रकरण काय?👇
साईनाथ अद्दलवार(मुख्याध्यापक महात्मा गांधी उच्च विद्यालय आरमोरी )यांनी सेवा ज्येष्ठता यादी वगळून मुख्याध्यापक पदी नियुक्ती व त्यांनी २ मे २०१२ नंतर केलेली अवैध शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची भरती तसेच शिक्षक भरती घोटाळा मधून बेकायदेशीर मार्गाने जमा केलेली संपत्ती याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी कैलास बगमारे यांनी केली आहे.त्यानुसार आता चौकशीचे धाड सत्र सुरू झाल्याने पुढील कारवाईकडे सर्वांच्या नजरा भिडल्या आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

डिझेलचा टँकर पलटी होताच इंधन नेण्यासाठी लोकांची झुंबड..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आधीच इंधन कमतरतेमुळे पेट्रोल पंपावर गर्दी होतांना दिसून येते.अश्यातच एखाद्या घटनेत चक्क इंधनाचा टँकर पलटी होऊन डिझेलचा महापूर होत असल्याची बाब...

तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील ‘शेतकरी योजना’ या उपक्रमांतर्गत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी...

गोदाम बांधकाम,तेल काढणी युनिट,कडधान्य प्रक्रिया व पॅकेजिंग युनिटसाठी लाखो रुपयांपर्यंत अनुदान.. – बना स्वतःच मालक; ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील भुईमूग,करडई,तीळ यांसारख्या तेलबिया पिकांचे तसेच तूर,हरभरा व इतर कडधान्यांचे उत्पादन वाढविण्यासोबतच त्यांचे मूल्यवर्धन आणि शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी...

शाळेची पहिली घंटा वाजणार ‘या’ दिवशी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील वाढती उष्णता लक्षात घेता यंदा शाळेची पहिली घंटा उशिरा सुरू होण्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून यंदा २०२६-२७ या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!