Wednesday, September 23, 2026
Homeगडचिरोलीअखेर आरडी एजंटच्या हत्या प्रकरणातील आरोपी अटकेत.. - आरोपीस सात दिवसाची पोलीस...

अखेर आरडी एजंटच्या हत्या प्रकरणातील आरोपी अटकेत.. – आरोपीस सात दिवसाची पोलीस कोठडी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरील नागमंदिराजवळील जंगल परिसरात सोमवार १९ जानेवारी २०२६ रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आलेल्या आरडी एजंटच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपीस पकडण्यात अहेरी पोलिसांना यश आले आहे. समय्या मलय्या सुंकरी वय ३५ वर्षे,रा.मद्दीगुडम, ता.अहेरी,जि.गडचिरोली असे अटकेतील आरोपीचे नाव आहे,तर रवींद्र तंगडपल्लीवार वय ४७ वर्षे,रा.नागेपल्ली, ता.अहेरी,जि.गडचिरोली असे मृतकाचे नाव असून ते आलापल्लीच्या प्रगती नागरी पतसंस्थेत आरडी गोळा करण्याचे काम करायचे.प्रकरणी आरोपी समय्या सुंकरी यास आज बुधवारी  न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास २८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
रविवार १८ जानेवारी रोजी रविंद्र तंगडपल्लीवार हे आपल्या पत्नीला आलापल्ली येथील प्रगती नागरी पतसंस्थेत आरडीचे पैसे भरून येतो,असे सांगून घरून निघाले होते.मात्र,सायंकाळ होऊनही ते घरी परतले नसल्याने घरच्यांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता बंद अवस्थेत होता. त्यामुळे,कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध केली.पण कुठेही थांगपत्ता लागत नसल्याने कुटुंबीयांनी अहेरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.त्यानुसार,दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवार १९ जानेवारी रोजी सकाळी साडे नऊच्या सुमारास आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरील नागमंदिराजवळील जंगल परिसरात रविंद्र तंगडपल्लीवार यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला होता.मृतदेहाच्या पाहणीनुसार खून झाल्याचे स्पष्ट झाले.घटनेचे गांभीर्य लक्षात घेता गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली,अहेरीचे अप्पर पोलीस अधीक्षक  कार्तीक मदीरा,उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या निर्देशानुसार विशेष तपास पथक गठीत करण्यात आले.लागलीच पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी समय्या सुंकरी यास अवघ्या ४८ तासात ताब्यात घेण्यात आले.प्रकरणी आरोपीने खून केल्याचे मान्य केले.मात्र,खूनामागचे कारण तसेच प्रकरणातील इतर बाबी अद्याप स्पष्ट न झाल्याने पोलिसांनी आरोपीस पोलीस कोठडीची मागणी करताच न्यायालयाने मान्य करून सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्ह्यातील २४ प्रकल्पांत ७६.१२ टक्के उपयुक्त पाणीसाठा.. – दुष्काळ परिस्थितीबाबत अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष नाही..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने पर्जन्यमान,पीकस्थिती,जलसाठा,भूजल पातळी तसेच शासनाने निर्धारित केलेल्या विविध निर्देशकांचा प्रशासकीय पातळीवर सविस्तर आढावा घेण्यात आला.जिल्ह्यातील पाऊस व पीक...

बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी; संपाच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार बँक..

उद्रेक न्युज वृत्त :-बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी असून युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (यूएफबीयू)२८ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत पुकारलेल्या तीन दिवसीय...

बदलते हवामान; पाऊस घालणार थैमान..!

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या हवामान बदलाचे संकेत असल्याने विदर्भातील नागपूर,यवतमाळ,चंद्रपूर, गोंदिया,भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांसह मुंबई मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे.हवामान विभागाच्या...

उच्च न्यायालयाचा दणका; अतिदुर्गम भागात दुचाकीने पोहोचले जिल्हाधिकारी व अधिकारी..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम लष्कर,गोपणार,मुरडपार,हॅलोदंडी आणि धिरंगी या गावांच्या मूलभूत विकासाला प्राधान्य देऊन विविध विभागांच्या लोककल्याणकारी व विकास योजनांचा लाभ जास्तीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!