Thursday, September 3, 2026
Homeनागपूर९ वर्षीय चिमुकला रोड ओलांडत असतांना अपघात..

९ वर्षीय चिमुकला रोड ओलांडत असतांना अपघात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-जिल्ह्याच्या उमरेड तालुक्यातील वडेगाव ते वेलसाखरा फाटा रोडलगत पोल्ट्री फार्म आहे.या ठिकाणी बाहेरगावातील काही मजूर कामावर आहेत.त्यांची मुले रोडलगत खेळत होती.अश्यातच खेळता-खेळता ९ वर्षीय चिमुकला रोड ओलांडत असतांना अचानकपणे सुसाट वेगाने आणि निष्काळजीपणाने चालकाने ओमनी कार पळवीत जोरदार धडक दिली.यात तो गंभीररीत्या जखमी झाला.ओमनी कारची धडक लागल्यानंतर चालक घटनास्थळावरून ओमनीसह पसार झाला.गंभीर जखमी चिमुकल्यास त्याच्या आई-वडिलांनी उमरेड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र,तपासणीअंती डॉक्टरांनी मृत घोषित केले.सदरची घटना उमरेड तालुक्यातील वडेगाव येथे काल रविवारी सकाळच्या सुमारास घडली.शिवम अण्णाजी आत्राम वय ९ वर्षे असे मृत बालकाचे नाव आहे.प्रकरणी उमरेड पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम २८१,१२५ (अ) (ब),१०६ (१),सहकलम १८४,१३४/१८७ मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा नोंदविला असून घटनास्थळावरून पसार झालेल्या कार चालकाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

आजपासून पुढील पाच दिवस पावसाळी वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात रिमझिम पाऊस व उघडीप सुरू आहे. काल बुधवारी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ५ मिमी पावसाच्या...

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!