उद्रेक न्युज वृत्त
उत्तर प्रदेश:- स्वतःच्या बेजबाबदार मुलांमुळे मन दुखावलेल्या एका ८० वर्षीय वृद्धाने आपली कोट्यवधी रुपयांची संपत्ती उत्तर प्रदेशच्या राज्यपालांच्या नावे केली आहे.वृद्धाने आपल्या अंत्यसंस्कारालाही मुलांनी हजर राहू नये; अशी इच्छा आपल्या मृत्युपत्रात म्हटले आहे.उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरात ही घटना घडली आहे. मुजफ्फरनगरच्या बुढाना तालुक्यातील बिराल गावात ८० वर्षीय तत्थू सिंह यांचे कुटुंब राहते.त्यांच्या पत्नीचा २० वर्षांपूर्वी मृत्यू झाला.नत्थू सिंह यांनी आपली दोन्ही मुले व ४ मुलींचे लग्न लावून दिले.त्यांच्या एका मुलाचा मृत्यू झाला आहे तर दुसरा मुलगा सहारनपूरमध्ये सरकारी शिक्षक आहे.५ महिन्यांपूर्वी नत्थू सिंह यांना नाईलाजाने वृद्धाश्रमात जावे लागले. कारण,त्यांना एकवेळचे जेवणही मिळत नव्हते.मुलगा व सुनेच्या व्यवहारामुळे दुखावलेल्या नत्थू सिंह यांनी सांगितले की, ते स्वतः स्वयंपाक करून उदरनिर्वाह करत होते.यामुळे त्यांनी आपली कोट्यवधी रुपयांची जवळपास १८ बीघा जमीन राज्यपालांच्या नावे केली आहे.त्यांनी आपल्या मुलालाही संपत्तीतून बेदखल केले आहे.