Wednesday, July 15, 2026
Homeनागपूर४ हजार रुपयांसाठी सहाय्यक आरटीओ अन् कनिष्ठ लिपिक अडकला एसीबीच्या जाळ्यात..!

४ हजार रुपयांसाठी सहाय्यक आरटीओ अन् कनिष्ठ लिपिक अडकला एसीबीच्या जाळ्यात..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-ट्रकवर कारवाई न करण्यासाठी ट्रक चालकाकडून चार हजार रुपयांची लाच घेणाऱ्या नागपूर ग्रामीणमधील सहाय्यक परिवहन अधिकारी (सहाय्यक आरटीओ)व कनिष्ठ लिपिकाला एसीबीने अटक केल्याने कारवाईमुळे परिवहन विभागात एकच खळबळ उडाली. अनुप सानप असे सहाय्यक परिवहन अधिकाऱ्याचे नाव असून मोहन दिवटे हा कनिष्ठ लिपिक आहे.संबंधित तक्रारदाराचा गिट्टीचा ट्रक आरटीओच्या पथकाने अडविला होता.ओव्हरलोड असल्याने त्याच्यावर ५० हजार ७५० रुपयांची चालान फाडून कारवाई करण्यात आली होती.तक्रारदार नागपूर ग्रामीण येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात गेला असता तेथे ट्रक सोडण्यासाठी दिवटेने पाच हजारांच्या लाचेची मागणी केली.लाच देण्याची इच्छा नसल्याने ट्रकमालकाने एसीबीकडे तक्रार केली.तक्रारीची शहानिशा झाल्यावर एसीबीने सापळा रचला.काल शुक्रवारी दुपारच्या सुमारास तक्रारदार दिवटेला भेटला.दिवटेने पाच हजार रुपयांत ट्रक सोडण्यासाठी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सानपने परवानगी दिल्याचे सांगितले.तक्रारदाराने दिवटेला चार हजार रुपये रोख दिले व एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले.पोलिसांनी सानपलादेखील ताब्यात घेतले.दोन्ही आरोपींविरोधात कपिलनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई पोलिस निरीक्षक राजकिरण येवले,जितेंद्र वैरागडे,भरत ठाकूर,हेमराज गांजरे,दीपाली भगत,होमेश्वर वाईलकर,राजेंद्र जांभूळकर यांच्या पथकाने केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता राज्यभरातील धनादेश अनादराची प्रकरणे परस्पर सामंजस्याने निघणार निकाली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये निगोशिएबल इन्स्ट्रुमेन्ट्स ॲक्ट,१८८१ च्या...

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!