Thursday, April 30, 2026
Homeगडचिरोली३५ व्या गडचिरोली नाट्यश्री कविता स्पर्धेचे मानकरी पुरुषोत्तम दहिकर...

३५ व्या गडचिरोली नाट्यश्री कविता स्पर्धेचे मानकरी पुरुषोत्तम दहिकर…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच गडचिरोली’ च्या वतीने आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते.या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते. या कवितेला आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी म्हणून पुरस्कृत करण्यात येते.
या उपक्रमाचे ३५ वे सत्र नुकतेच पार पडले असून यात ४१ कवींनी सहभाग नोंदविला होता.या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात गडचिरोली येथील कवी पुरुषोत्तम दहिकर यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या “जीवनाची संध्याकाळ ” या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे; असे नाट्यश्रीचे संचालक तथा नाटककार चुडाराम बल्हारपुरे सह कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.
पुरुषोत्तम महादेव दहिकर हे गडचिरोली येथील रहिवासी असून सेवानिवृत्त बॅंक अधिकारी आहेत.ते
नवोदित कवी असून सेवानिवृत्तीनंतर वयाच्या उत्तरार्धात त्यांनी कविता लेखनास सुरुवात केलेली आहे.आजवर त्यांनी १०० च्या वर कवितांचे लेखन केलेले असून व्हॉट्सॲप व फेसबुकवर सातत्याने ते कवितांचे सादरीकरण करीत असतात.त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे.त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्रीचे प्रा.‌अरुण बुरे,दादा चुधरी,दिलीप मेश्राम, प्रा.यादव गहाणे तसेच नाट्यश्रीच्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
या ३५ व्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने संतोष कपाले,  प्रा.पंढरी बनसोडे,तुळशीराम उंदीरवाडे,जयराम धोंगडे, पुनाजी कोटरंगे,रविंद्र गेडाम,संगीता ठलाल,पी. डी.काटकर,प्रेमिला अलोने,लता शेंद्रे,रोहिणी पराडकर, संगीता रामटेके,वसंत चापले,सुरज गोरंतवार,डॉ. चंद्रकांत लेनगुरे,राजेंद्र यादवराव सोनटक्के, नरेंद्र गुंडेली,राजरत्न पेटकर,भिमानंद मेश्राम,मुरलीधर खोटेले,उकंडराव नारायण राऊत,वामनदादा गेडाम, सुभाष धाराशिवकर, रेखा दिक्षित,खुशाल म्हशाखेत्री, रंजना चुधरी,ज्योत्स्ना बन्सोड,सोनाली रायपुरे,हरिष नैताम,उत्तम गेडाम,मिलींद बी.खोब्रागडे,गजानन गेडाम,शैला चिमड्यालवार, पुरुषोत्तम दहिकर,गणेश रामदास निकम,विलास जेंगठे, मधुकर दुफारे,सुरेश गेडाम, केवळराम बगमारे,मंदाकिनी चरडे इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार असल्याचे नाट्यश्रीचे संचालक तथा नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!