Monday, June 22, 2026
Homeनागपूर३० वर्षीय तरुणाचा नदीत बुडून मृत्यू..

३० वर्षीय तरुणाचा नदीत बुडून मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-जिल्ह्याच्या हिंगणा तालुक्यातील कोतेवाडा परिसराच्या वेणा नदीत बुडून एका ३० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे,नदीतील पाण्यात उतरून मासे पकडणे तरुणाच्या जीवावर बेतले.सदरची घटना काल रविवारी दुपारच्या सुमारास घडली.मात्र,अद्यापही तरुणाचा शोध लागलेला नसल्याने आज,सोमवार २२ जूनच्या सकाळपासून अग्निशमन दल,जलतरण बचाव पथक आणि बोटीने शोधमोहीम सुरू आहे.स्वप्निल दीपक पाटील वय ३० वर्षे,रा.रामेश्वरी,नागपूर असे नदीत बुडून मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.
रामेश्वरी परिसरातील चार मित्र काल रविवारी सकाळच्या सुमारास दुचाकीने गुमगावमार्गे कोतेवाडा येथील वेणा नदी परिसरात फिरण्यासाठी गेले होते. काही वेळ नदीच्या काठावर फेरफटका मारल्यानंतर त्यांनी पोहण्याचा निर्णय घेतला.यावेळी स्वप्निल पाटील याला नदीत मासे पकडण्याचा मोह झाला. त्याने कपडे काढून नायलॉनचे जाळे घेत वेणा नदीत प्रवेश केला.मात्र,खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो अचानक पाण्यात बुडू लागला.त्याच्या तीन मित्रांसमोरच हा प्रकार घडल्याने मित्रांनी आरडाओरड करीत मदतीसाठी धावपळ सुरू केली.मात्र,तोपर्यंत खूप उशीर झाला होता.दरम्यान, घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तात्काळ जलतरण बचाव पथकाला पाचारण करण्यात आले.तसेच वानाडोंगरी आणि मिहान येथील अग्निशमन दलाच्या दोन पथकांनाही मदतीसाठी बोलावण्यात आले.बोटीने नदीत शोधमोहीम राबविण्यात आली.मात्र,अंधार पडल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच स्वप्निल पाटील यांचे कुटुंबीय घटनास्थळी पोहचून स्तब्ध झाले.घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कर्जफेडीसाठी दिलेला चेक बाऊन्स; दोषीला एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-एका बँकेकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम परतफेड करण्यासाठी दुसऱ्या बँकेचा चेक दिला खरी, पण जो चेक देण्यात आला,त्या बँकेच्या खात्यात पुरेसे पैसेच...

अवैध तंबाखू साठवणूक व विक्री करणाऱ्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्रात गुटखा,पानमसाला आणि सुगंधीत तंबाखूवर राज्य शासनाने १९ जुलै २०१२ पासून सक्तीची बंदी लादली; मात्र गेल्या १४ वर्षांत ही बंदी कागदोपत्रीच...

शेतकऱ्याचा जीव घेणाऱ्या वाघाच्या हालचालींवर वनविभागाची बारकाईने नजर..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी वनविभागाच्या तळोधी(बा.)वनपरिक्षेत्रांतर्गत गोविंदपूर उपक्षेत्रातील नागभीड तालुक्याच्या गिरगाव जंगल परिसरात वाघाच्या हल्ल्यात आत्माराम दसरू बोरकर वय ५२ वर्षे,रा.गिरगाव,ता.नागभीड...

उद्यापासून पावसाळी अधिवेशनास सुरुवात; सत्ताधारी आणि विरोधक येणार आमनेसामने..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन हे उद्या,सोमवार २२ जून २०२६ पासून सुरू होणार आहे. सदरचे अधिवेशन तब्बल तीन आठवडे चालणार असून राज्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!