उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- भामरागड तालुक्यातील मर्दहूर गावातील २६ वर्षीय निष्पाप मुलाची नक्षल्यांनी गोळ्या झाडून हत्या केल्याने मुलाला रक्ताच्या थारोळ्यात पाहून आई- वडील व दोन भावंडांनी टाहो फोडला होता.आमच्या निष्पाप लेकराची काय चूक,त्याला का म्हणून मारले, असे म्हणत आई-वडिलांसह नातेवाइकांनी एकच आक्रोश केला.त्यामुळे भामरागड ग्रामीण रुग्णालय परिसरातील वातावरण सुन्न झाले होते.
सदर घटना ९ मार्च २०२३ रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास तीन नक्षली वेशभूषेत आले.साईनाथ चैतू नरोटी वय २६ वर्षे हा शेतात काम करीत असतांना बोलण्यासाठी म्हणून साईनाथ ला गणवेशातील तीन नक्षली दूर घेऊन गेले.बराच वेळ होऊनही तो परतलाच नाही.काही वेळाने एका शेतकऱ्याने मुलाचा मृतदेह आढळल्याची माहिती दिली,त्यानंतर साईनाथ नरोटीच्या कुटुंबाने तिकडे धाव घेतली.मुलाला रक्ताच्या थारोळ्यात पाहून नक्षल्यांनी गोळ्या झाडून हत्या केले असल्याचे उघडकीस आले होते.
हत्या केल्यानंतर मुख्य आरोपी जंगलात दडून बसला असल्याची माहिती नक्षलविरोधी अभियानाच्या जवानांनी मिळाली.त्यानुसार सापळा रचून १४ मार्चच्या रात्री प्रकाश ऊर्फ देविदास ऊर्फ आडवे मुरे गावडे वय २७ वर्षे रा.मर्दहूर,तालुका-भामरागड असे नक्षल्याचे नाव असून त्याचे दोन साथीदार फरार आहेत.
फेब्रुवारी ते मे या कालावधीत नक्षलवादी ‘टीसीओसी’ (‘टक्टिकल काऊंटर ऑफेन्सिव्ह कॅम्पेन) साजरा करतात.यादरम्यान नक्षलवादी मोठ्या प्रमाणात हिंसक कारवाया घडवून आणतात.नक्षली प्रकाश गावडे हा मार्च २००० पासून नक्षल चळवळीत असून, त्याने विविध दलममध्ये काम केले आहे.त्याच्यावर २२ गुन्हे दाखल आहेत.साईनाथ नरोटीच्या हत्येच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली असून, या हत्येत सहभागी अन्य दोन आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.