उद्रेक न्युज वृत्त
कोंढाळा :- देसाईगंज तालुका मुख्यालयापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या कोंढाळा गावातील पळसगाव वैनगंगा नदी घाटावर २३ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्रो जवळपास १२.३० वाजता च्या सुमारास एक अनोखा प्रकार घडला असून,अवैधरीत्या रेतीची विना वाहतूक करतांना दोन ट्रॅक्टर पकडून,पकडलेल्या ट्रॅक्टर धारकांकडून अंधाराचा फायदा घेत १ लाख रुपये घेऊन अवैध रेतीचे ट्रॅक्टर सोडणारे ‘ते’ अधिकारी व कर्मचारी कोण? अशी खमंग चर्चा सर्वत्र गावामध्ये सुरू असल्याने अवैध वसुली करणारे चर्चेचा विषय ठरू लागले आहेत.
कोंढाळा-पळसगाव वैनगंगा नदी घाटावरून बऱ्याच दिवसांपासून अवैधरीत्या रेतीची विना वाहतूक परवाना तस्करी केली जात आहे.अशातच २३ फेब्रुवारी रोजी रात्रो जवळपास १२.१५ ते १२.३० वाजेच्या दरम्यान एक ट्रॅक्टर रेती घाटातून निघत असल्याची माहिती एका विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुपितरित्या मिळाली असता; त्यांनी घटना स्थळ गाठून रेती तस्कराचा पाठलाग करून त्यास पकडले.एका रेती तस्करास पकडल्याने त्याने नदी रेती घाटात असलेल्या दुसऱ्या रेती तस्कराचे नाव सांगितल्याने ‘सोने पे सुहागा’ असे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे झाले.जिथे एकाचे लाल व्हावे तिथे दोघांचे लाल आणि पाणी झाले.असे दोन्ही मिळून मालपाणी झाल्याने दाम दुप्पट झाले.
मग ठरले ५० हजार रुपये अधिक ५० हजार रुपये, यामध्ये समजोता करून दोन्ही ट्रॅक्टर धारकांना सोडून ‘तेरी भी चूप,मेरी भी चूप’ असा खेळ रंगून तालीम शांत झाली.मात्र सदर घटनेची चर्चा सर्वत्र गुंजु लागल्याने सर्वांचे पितळ उघडे पडले आहे.काही जणांची ऑडियो क्लिपही बाहेर येण्याची शक्यता बळावली असल्याने ‘ते’ अधिकारी,कर्मचारी कोण? हे लवकरच कळणार आहे.