उद्रेक न्युज वृत्त :- आजचा दिवस १४ फेब्रुवारी म्हणजे तरुणांसाठी प्रेमाच्या आणाभाका टाकण्याचा दिवस.ग्रामीण भागात याला तेवढे महत्व दिले जात नाही.मात्र शहरातील युवक-युवतींसाठी आजचा दिवस विशेष महत्वाचा मानला जातो आहे.जसे प्रेम करण्यासाठी वय नसते; त्याचप्रमाणे प्रेम करण्यासाठी कोणताही दिवस, आठवडा किंवा महिना नसतो.प्रेम कधीही व्यक्त करता येते.पण प्रेम व्यक्त करणे इतके सोपे नाही. म्हणूनच १४ फेब्रुवारी हा दिवस प्रेम करणाऱ्यांसाठी खूप महतत्वाचा समजला जातो.यालाच प्रेमाचा दिवस किंवा प्रेमाचा महिना म्हणतात.१४ फेब्रुवारीच्या एक आठवडा आधी; प्रेमाचा हंगाम म्हणजेच ‘व्हॅलेंटाइन सप्ताह’ सुरू होतो. आणि तरुणाई खास व्हॅलेंटाइन सप्ताहाचे वेगवेगळे दिवस साजरे करतात.१४ फेब्रुवारी कां निश्चित केला गेला आणि तो साजरा करण्यामागील इतिहास काय आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे.१४ फेब्रुवारी ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करण्यामागील एक अनोखी कहाणी आहे.
‘ऑरिया ऑफ जेकोबस डी वराजिन’ या पुस्तकात व्हॅलेंटाईन डेचा उल्लेख केला आहे.त्यानुसार हा दिवस रोमचा धर्मगुरू ‘सेंट व्हॅलेंटाइन’ यांना समर्पित आहे. संत व्हॅलेंटाईन २७० एडी मध्ये होते आणि ते प्रेमाचा प्रचार करीत असत.संत व्हॅलेंटाईन जगभर प्रेमाचा संदेश द्यायचे.मात्र त्यावेळी रोमचा राजा क्लॉडियसचा प्रेमसंबंधांना कडाडून विरोध होता.प्रेम आणि प्रेमविवाहावर त्यांचा विश्वास नव्हता.खरं तर, राजा क्लॉडियसचा असा विश्वास होता की प्रेम किंवा आसक्तीमुळे किंवा एखाद्याकडे झुकल्यामुळे सैनिकांचे लक्ष विचलित होते आणि म्हणूनच रोमन सैन्यात सामील होऊ इच्छित नव्हते.म्हणूनच क्लॉडियसने रोममध्ये सैनिकांच्या लग्नावर आणि प्रतिबद्धतेवर बंदी घातली.संत व्हॅलेंटाईन यांनी याचा निषेध करत आवाज उठवला.संत व्हॅलेंटाईनने रोमच्या राजाच्या विरोधात जाऊन अनेक विवाह केले. याच कारणामुळे संत व्हॅलेंटाईनला फाशी देण्यात आली. तो दिवस १४ फेब्रुवारीचा होता.संत व्हॅलेंटाईनने फाशी देण्यापूर्वी राजाच्या जेलरच्या मुलीला एक पत्र देखील लिहिले होते.यात संत व्हॅलेंटाईन यांनी आपल्या अंध मुलीला मृत्यूनंतर नेत्रदान करण्याबाबत सांगितले होते.जरी सेंट व्हॅलेंटाईनला वधस्तंभावर खिळले असेले तरी प्रेम करणाऱ्यांसाठी ते अजरामर झाले आणि संत व्हॅलेंटाईनच्या स्मरणार्थ दरवर्षी १४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा केला जातो आणि त्याला प्रेमिकांचा दिवस म्हणतात.