Wednesday, July 29, 2026
Homeगडचिरोली११ लाखाची रोकड गडचिरोली तपासणी पथकाकडून जप्त….

११ लाखाची रोकड गडचिरोली तपासणी पथकाकडून जप्त….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- लोकसभा निवडणुक आचारसंहितेच्या काळात गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी नेमण्यात आलेल्या तपासणी पथकाद्वारे काल रात्री दोन प्रकरणात एकूण ११ लाख १०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

जिल्ह्यात १६ मार्च पासून लोकसभा निवडणूक प्रक्रिया पुर्ण होण्याच्या तारखेपर्यंत आदर्श आचारसंहिता लागू असून व्हिडिओ सर्वेक्षण पथक, भरारी पथक,स्थिर सर्वेक्षण पथकाद्वारे विविध ठिकाणी तपासणी करण्यात येत आहे. 

भरारी पथक क्रमांक १२६८०१ यांना १४ एप्रिल रोजी रात्रो ९.३० वाजता शासकीय विज्ञान महाविद्यालय गडचिरोली जवळील,महादेव मंदीराचे समोर नाकाबंदी दरम्यान एक पांढऱ्या रंगाची व्हेन्यु हुडाई कंपनीचे चारचाकी वाहनात रोख रक्कम असलेली बॅग आढळून आली.याबाबत वाहनचालकाला समाधानकारक उत्तरे देता न आल्याने पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या निर्देशानुसार भरारी पथक प्रमुख खेमराज लेगनुरे यांनी सदर रकम जप्त केली.पंचासमक्ष वाहनाच्या मागील सीटवर असणाऱ्या काळया बॅग उघुन पाहणी केली असता,सदर बॅगमध्ये एकूण १० लाख १०० रुपये आढळले.सदर रकम जप्त करुन वाहनचालकास जप्ती पावती देण्यात आली.व सदर रक्कमेबाबत असणाऱ्या आर्थिक उलाढालीचे कागदपत्रे समक्ष प्राधिकाऱ्यांकडे हजर करण्याबाबत सुचना देण्यात आली. 

यानंतर लगेचच याच ठिकाणी रात्रो ९.५० वाजताचे सुमारास एक पांढऱ्या रंगाची फोर्ड कंपनीचे चारचाकी वाहनाचे समोरील डिक्कीत एक लाख रुपये रोख रक्कम आढळून आली.सदर रकम घराचे बांधकामाकरिता भाऊकडून आणली असल्याचे सांगण्यात आले.परंतु सदर रोख रक्कम बाबत खात्री करणे गरजेचे असल्याने भरारी पथकाद्वारे सदर रकम जप्त करून आर्थिक उलाढालीचे कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

 वरील दोन्ही प्रकरणात तपास सुरु असल्याची माहिती आदर्श आचारसंहिता समितीचे नोडल अधिकारी तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांनी दिली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तुकाराम मुंढेंनी शाळा व्यवस्थापनावर सोपवली मोठी जबाबदारी; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी विविध निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धडक कारवाईचे सत्र सुरू असतांनाच आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी...

माझा वाढदिवस-एक झाड उपक्रम; देसाईगंज आदर्श महाविद्यालयाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा आणि वृक्षारोपणाची सवय प्रत्येकामध्ये रुजावी या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,देसाईगंज येथे "माझा वाढदिवस-एक झाड" हा...

राज्यांतर्गत पिकस्पर्धा; आता शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज करण्याची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी तसेच प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांच्या कार्याचा गौरव करून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने...

राज्य सरकार म्हणतेय; गौण खनिजांच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर दहापट दंड आकारू.. -चोर खरोखरच चोऱ्या करणे सोडणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-गौण खनिजांची चोरी करणे ही काही चोरट्यांसाठी नित्याचीच बाब झाली आहे.काहींना अवैध रेती,मुरूम,दगड,माती व इतर गौण खनिजांची चोरी केल्याशिवाय चैनच पडेनासे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!