Saturday, June 13, 2026
Homeगडचिरोलीह्युमन मेटान्यूमोव्हायरस (HMPV)) सामान्य विषाणू आजार.. - मनात कुठलीही भीती न बाळगता...

ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (HMPV)) सामान्य विषाणू आजार.. – मनात कुठलीही भीती न बाळगता दक्षता घेण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-हल्ली सर्वत्र मोठ्या प्रमाणावर ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) विषाणू बाबत लोकांच्या मनात भीती निर्माण करणाऱ्या बातम्या प्रसारित होऊ लागल्या आहेत.त्यामुळे याबाबत आरोग्य विभागाने ह्युमन मेटान्यूमोव्हायरस ( एचएमपीव्ही) हा एक सामान्य विषाणू असून नागरिकांनी त्याची भिती न बाळागता या संसर्गापासून बचावासाठी देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
एचएमपीव्ही श्वसन मार्गाच्या वरील भागातील संसर्गास कारणीभूत ठरतो.हा हंगामी रोग असून हिवाळा आणि उन्हाळयाच्या सुरुवातील सामन्यत: आरएसव्ही आणि फ्लू प्रमाणे उद्भवतो.सध्या चीनमध्ये ह्यूमन मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) या आजाराचे रुग्ण वाढले,अशा बातम्या येत आहेत.हा विषाणू सर्वप्रथम २००१ मध्ये नेदरलँडमध्ये आढळला.
सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील श्वसनाच्या संसर्गाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे.वर्ष २०२३ च्या तुलनेत डिसेंबर २०२४ मध्ये कोणतीही वाढ झालेली नाही.तथापि,खबरदारीचा एक भाग म्हणून नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गपासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये,या संदर्भातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुढील सुचानाचे पालन करावे.
काय करावे 👇
१.खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा तोंड आणि नाक,रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाकावे.
२.साबण आणि पाण्याने आपले हात वारंवार धुवा.
३.ताप,खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणापासून दूर राहा.
४.भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक अन्न खा.
५.संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुविजन (व्हेटीलेषण) होईल,याची दक्षता घ्या.
काय करू नये👇
 १.हस्तांदोलन,
२.टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर,
३.आजारी लोकांशी जवळचा संपर्क,
४.डोळे,नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे.
५.सार्वजनिक ठिकाणी थुंकणे.
६.डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध(सेल्फ मेडिकेशन)घेणे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

​देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात परिचारिकेच्या प्रसंगावधनाने वाचले प्रसूतीपश्चात मातेचे प्राण..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात एका प्रसूतीपश्चात मातेला हृदयविकाराचा झटका(Cardiac Arrest)आला असता कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेने अत्यंत कौतुकास्पद कामगिरी करत आणि तत्परतेने सीपीआर(CPR)देऊन मातेचे...

त्वरा करा..! रेशन दुकानातून तांदूळ अन् गहू उचलण्यासाठी उरले केवळ दोनच दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-गरजू नागरिकांना पुरवठा विभागातर्फे स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य वितरण करण्यात येते.मे व जून महिन्याचे धान्य वाटप करण्याची अंतिम तारीख १५ जून...

खर्रा खाणाऱ्यांनो सावधान..! बाजारात नकली तंबाखूचा शिरकाव.. – मशीनच्या सहाय्याने नकली तंबाखू तयार करणाऱ्यासह ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विदर्भातील बऱ्याचश्या जिल्ह्यात आजही जवळपास ७० ते ८० टक्के लोकं खर्रा खाण्याचे शौकीन आहेत.तंबाखूची वाढती मागणी लक्षात घेता "मरणारे मरोत आणि...

देसाईगंज शहरातील पाणी पुरवठा योजनेचे काम संथगतीने करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत देसाईगंज शहरात कोट्यवधी रुपयांचे पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने कामाच्या विलंबामुळे शहरातील नागरिकांना पिण्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!