Sunday, September 13, 2026
Homeगडचिरोलीहृदय हेलावणारी आजची घटना..! नवविवाहित युवकाने नववधूच्या मांडीवर डोके टेकत सोडला...

हृदय हेलावणारी आजची घटना..! नवविवाहित युवकाने नववधूच्या मांडीवर डोके टेकत सोडला प्राण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या अतिदुर्गम,आदिवासीबहुल भागातील कोरची तालुक्याच्या गहाणेगाटा गावात
हृदयाला हेलावणारी घटना आज,शनिवार ३ मे रोजी घडली.नुकतेच तीन दिवसांपूर्वीच लग्न झालेल्या एका २६ वर्षीय नवविवाहित युवकाची अचानकपणे प्रकृती बिघडली.अशातच रुग्णालयात उपचारासाठी जात असतांना वाटेतच नववधूच्या मांडीवर डोके टेकत  प्राण सोडल्याने नववधूने एकच हंबरडा फोडला.नारायण कंवलसिंह बोगा रा.गहाणेगाटा,ता.कोरची,जि.गडचिरोली असे मृत्यू झालेल्या नवविवाहित युवकाचे नाव आहे.
नारायण बोगा याचे नुकतेच बुधवार ३० एप्रिल रोजी दीपिका फिरुराम कुमेटी (रा.माधोपूर,ता.मानपूर-चौकी, छत्तीसगड)हिच्याशी विवाह झाला होता.याच दिवशी त्याच्या पोटात दुखु लागले.मात्र,त्याने त्याकडे दुर्लक्ष केले.परत दुसऱ्या दिवशी म्हणजेच रिसेप्शनच्या दिवशी गुरुवार १ मे ला पोटात कसेतरी वाटत असल्याने नजीकच्या खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घेतले. त्यामुळे काहीकाळ बरे वाटले.त्यातच आज शनिवारी परत नारायणच्या पोटात दुखु लागल्याने नववधू व त्याचा मित्र तिघेही दुचाकीने रुग्णालयात जाण्यास निघाले. अशातच वाटेतच कसेतरी वाटू लागल्याने बोरी गावाजवळ दुचाकी थांबवून नारायणने नववधूच्या मांडीवर डोका टेकला. डोका टेकताच नारायणने प्राण सोडला.मित्र व नववधूने आवाज देवून हलवून बघितले असता नारायणने कुठलाही प्रतिसाद न दिला नाही. त्यातच नारायणच्या आईला बातमी कळताच तिचे काळीज फाटल्यासारखे झाले.कारण १५ वर्षांपूर्वी नारायणच्या वडिलांचे निधन झाले होते.आईने काबाडकष्ट करुन नारायणला लहानाचे मोठे केले होते. आई आणि नारायण हे दोघेच राहायचे. हृदय हेलावणारी घटना घडल्याने घटनेने अख्खे गाव हळहळले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाळू घाटांच्या लिलाव प्रक्रियेसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे व धोरणात्मक बदल जारी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील वाळू आणि वाळू घाटांच्या लिलाव प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी तसेच अवैध उत्खननाला आळा घालण्यासाठी नवीन मार्गदर्शक...

चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘जत्रा घडली नागोबाची’ या लोकनाट्यास सातारा येथील पुरस्कार जाहीर.. -यंदाचा सहावा पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट,डाकेवाडी(जि. सातारा)या संस्थेतर्फे दरवर्षी मराठी साहित्यिकांसाठी उत्कृष्ट वाड्.मय स्पर्धा घेण्यात येते व पुरस्कारप्राप्त साहित्यिकांना स्पंदनच्या वार्षिक साहित्य संमेलनात उत्कृष्ट...

शाळेत विद्यार्थ्यांना दिली जाणारी शारीरिक शिक्षा पॉक्सो कायद्यांतर्गत लैंगिक गुन्ह्याच्या श्रेणीत येत नाही-सर्वोच्च न्यायालय -शिक्षकावरील संपूर्ण खटला रद्द..

उद्रेक न्युज वृत्त :-शाळेत शिक्षकाने दोन विद्यार्थिनींना दिलेल्या शिक्षेवरून शिक्षकाविरोधात नोंदवण्यात आलेला गुन्हेगारी खटला सर्वोच्च न्यायालयाने पूर्णपणे रद्द करून शाळेत विद्यार्थ्यांना दिली जाणारी शारीरिक...

आपसी समझोत्याने ४६१ प्रकरणे निकाली; तब्बल ४ कोटी १६ लाखांहून अधिकच्या रकमेवर तडजोड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्हा न्यायालय तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये शनिवार १२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!