- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज
नागपूर :-औरंगजेबाची कबर हटवण्यावरून सोमवारी १७ मार्च रोजी नागपुरात झालेल्या हिंसाचार प्रकरणी मास्टरमाइंड फहीमसह ६ आरोपींविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फहीमवर ५०० हून अधिक दंगलखोरांना गोळा करण्याचा आणि हिंसाचार भडकवण्याचा आरोप आहे.अशातच हिंसाचारातील मुख्य आरोपी फहीम खानने नागपूर सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे.फहीमने असा दावा केला आहे की,विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवर कारवाईची मागणी केल्यामुळे त्याला राजकीय सूडबुद्धीतून अटक करण्यात आली.अल्पसंख्याक डेमोक्रॅटिक पक्षाचा शहराध्यक्ष फहीम खान याची काल शुक्रवारी पोलिस कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले.यानंतर फहीमने नागपूर जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्जही दाखल केला.जामीन अर्जात म्हटले आहे की,त्याला या प्रकरणात खोटे गोवण्यात आले आहे आणि त्याने जमावाला भडकावल्याचा कोणताही पुरावा नाही.हे आरोप खोटे आणि निराधार आहेत आणि पोलिसांनी हिंसाचारात त्याची थेट भूमिका असल्याचे सांगितलेले नाही.त्याच्याविरुद्ध दाखल केलेला खटला राजकीय सूड बुद्धीने चालवला जात आहे.कारण १८ मार्च रोजी त्यांनी विश्व हिंदू परिषदेच्या सदस्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी केली होती.त्याचे वकील अश्विन इंगोले म्हणाले की,या प्रकरणाची सुनावणी २४ मार्च रोजी होऊ शकते.काल शुक्रवारी संध्याकाळपर्यंत,पोलिसांनी नागपूर हिंसाचार प्रकरणात आणखी १४ जणांना अटक केली. त्यामुळे अटक केलेल्यांची एकूण संख्या १०५ झाली आहे,ज्यात १० किशोर वयीन मुलांचा समावेश आहे. याशिवाय स्थानिक न्यायालयाने १७ जणांना २२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल शुक्रवारी संध्याकाळी नागपूरला पोहचले असून आपण रात्री नागपूरलाच राहू.नागपूरमधील हिंसाचारासाठी जबाबदार असलेल्यांना सोडले जाणार नाही,असे त्यांनी मंगळवारी राज्य विधानसभेत म्हटले होते.
- Advertisement -