Sunday, October 4, 2026
Homeगडचिरोलीहातातोंडाशी आलेले पीक जंगली हत्तींमुळे उद्ध्वस्त; शेतकरी चिंताग्रस्त..

हातातोंडाशी आलेले पीक जंगली हत्तींमुळे उद्ध्वस्त; शेतकरी चिंताग्रस्त..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जंगली हत्तींचा कळप ऐन निसाव्यावर आलेल्या धानपिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस करीत असल्याने शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाले आहेत. अश्यातच गेल्या तीन दिवसांपासून जंगली हत्तींचा कळप पोर्ला वनपरिक्षेत्रातील चुरचुरा बिटात ठाण मांडून बसल्याने परिसरातील शेतकरी बांधवांची धाकधूक वाढली आहे.विशेष म्हणजे,कळपात एक- दोन नव्हे,तर तब्बल ३३ हत्तींचा समावेश आहे.त्यातच,चुरचुरा बिटातील चुरचुरा,कुऱ्हाडी,महादवाडी परिसरातील शेतांमध्ये हत्तींचा वावर वाढला आहे.कळपातील हत्ती धानपिके तुडवत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.यंदाच्या खरीप हंगामात हत्तींकडून पिकांचे नुकसान होण्याची ही तिसरी वेळ असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे.दरम्यान,रात्रीच्या सुमारास हत्तींचा कळप महादवाडी गावाजवळील ठाकरे फार्म हाऊसजवळ पोहोचल्याने एकच खळबळ उडाली.कळपावर वनविभागाकडून बारकाईने नजर ठेवली जात असली तरी हत्तींच्या सततच्या वावरामुळे शेतकऱ्यांना धडकी भरली आहे.काहींनी उसनवारी व बँकांतून कर्ज काढून शेती पिकवण्याचा धाडस केला आहे; मात्र,जंगली हत्ती या धाडसावर पूर्णपणे पाणी फेरत असल्याचे चित्र आहे. प्रसंगी वनविभागाने हत्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यांना पिकांच्या क्षेत्रापासून दूर हुसकावून लावावे,अशी मागणी परिसरातील शेतकरी बांधवांनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव ट्रेलरची दुचाकीला जोरदार धडक; पती-पत्नी व चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरहून बुटीबोरीकडे दुचाकीने निघालेल्या कुटुंबियांवर काळाने घाला घालून दुचाकीवरील पती, पत्नी व अवघ्या चार वर्षाच्या चिमुकल्याचा करून अंत झाला.तर त्यांचा ६...

धावत्या पिकअप वाहनाचा अपघात; नऊ जण गंभीर जखमी,तर आठ जण किरकोळ जखमी..

उद्रेक न्युज वृत्त :-पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर जिल्ह्यात निघालेल्या मजुरांच्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना आज,शनिवार ३ ऑक्टोंबर रोजी पहाटेच्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलिस...

काँग्रेसकडून विधान परिषद निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची घोषणा.. -नागपूर पदवीधर मतदार संघासाठी अभिजीत वंजारी यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ रोजी निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा  केली.यामध्ये नागपूर पदवीधर...

राहत्या घरातच सुरू होता देहव्यापाराचा अड्डा; पोलिसांची धाड.. – दोन पिडीत महिलांची सुटका,तर दोन महिलांना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राहत्या घरात देहव्यापाराचा अड्डा चालवणाऱ्या दोन महिलांना अटक करण्यात चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले आहे.या प्रकरणी घटनास्थळावरून आरोपींच्या ताब्यातून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!