- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात याचिकेवरील ६ मे २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने पुढील चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते.मात्र, पावसाळा आणि सणासुदीमुळे निवडणुका दिवाळीनंतर घेत असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयात सादर करणार असल्याची माहिती आहे.अश्यातच आता महाराष्ट्र राज्यातील येत्या काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील मोठी माहिती पुढे आली आहे.होऊ घातलेल्या निवडणुका तीन टप्प्यांमध्ये होणार असून निवडणुकींमधील प्रभाग रचना आणि इतर कामांसाठी २०११ ची लोकसंख्याच ग्राह्य धरली जाणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार,तीन टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकींमधील पहिला टप्पा हा जिल्हा परिषदांचा असणार आहे.पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत.तर दुसऱ्या टप्प्यामध्ये नगरपालिका तसेच नगरपरिषदांच्या निवडणुका होतील.तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात ग्रामपंचायतीसह इतर सर्व महापालिकांच्या निवडणुका होतील.डिसेंबर २०२५ अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचा निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे.असे झाले तर दिवाळीनंतर आचारसंहिता लागू होऊन राज्यात निवडणुकीचा धुरळा उडणार.
- Advertisement -

