Thursday, June 25, 2026
Homeगोंदियाअनियंत्रित ट्रकचा विचित्र अपघात; एकाला चिरडले, कारवर धडक,दोन दुचाकींचा चेंदामेंदा..!

अनियंत्रित ट्रकचा विचित्र अपघात; एकाला चिरडले, कारवर धडक,दोन दुचाकींचा चेंदामेंदा..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-जिल्ह्याच्या देवरी शहरात एका विचित्र अपघाताची चर्चा परिसरात सुरू असून एकजण जागीच ठार तर पाचजण जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे.प्रकरणी देवरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.नागपूरकडून रायपूरकडे भरधाव वेगाने धावणाऱ्या ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून ट्रकने पहिल्यांदा देवरी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५३ वरील राधिका हॉटेलसमोरील दुभाजक ओलांडले.नंतर तोच ट्रक उजव्या बाजूच्या महामार्गाला ओलांडून बॅरीकेट्स तोडत महामार्गाच्या कडेला असलेल्या बॅरीकेट्‌सजवळ बसून असलेल्या सुखदास गावडकर वय ६० वर्षे रा.जरताळटोला या वृद्ध इसमास ट्रकने चिरडले.यात तो जागीच ठार झाला.नंतर तोच ट्रक सर्व्हिस रोडवर असलेल्या एमएच ३३ व्ही ८८८० क्रमांकाच्या दिशेने गेला आणि जोरदार धडक देताच कार दूरवर उसळली.यात रस्त्याच्या कडेला असलेल्या जैन ट्रॅव्हल्सच्या शेडसमोर असलेल्या दोन दुचाकींचा चेंदामेंदा करीत ट्रक विद्युत खांबावर जाऊन धडकला.यावेळी तिथे उभे असलेले तिघे जण शेडखाली दबल्याने जखमी झाले.तर जैन ट्रॅव्हल्सच्या बाजूला असलेल्या बूट हाऊसमध्ये बसून असलेला इसम तिथून पळ काढत असतांना त्याला कारची धडक लागल्याने तोसुद्धा यात जखमी झाला.सदरचा विचित्र अपघात देवरी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र.५३ वरील राधिका हॉटेलसमोर काल शुक्रवारी घडला.यात एक वृद्ध जागीच ठार झाला तर यात टिकेश राऊत वय ३८ वर्षे पिंडकेपार,नीलेश वधारे वय ३७ वर्षे देवरी,सुभाष बिंजलेकर वय ४५ वर्षे देवरी व सुरेंद्र बनसोड वय ५२ वर्षे धोबीसराड हे जखमी झाले.तसेच ट्रकचालक मदनसिंग नागर रा.मेडकिधाकड,देवास मध्य प्रदेश हासुद्धा यात गंभीर जखमी झाला.अपघातात जखमी झालेल्यांना घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी त्वरित देवरी येथील ग्रामीण रुग्णालय दाखल केले.त्यांच्यावर उपचार सुरू असून ट्रक विद्युत खांबाला धडकल्याने विद्युत तारा तुटून पडल्या आणि तब्बल सात तास देवरी शहराचा वीज पुरवठा खंडित झाला होता.विचित्र अपघात प्रकरणी देवरी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आकांक्षित जिल्हा कामगिरीत गडचिरोली देशात ‘टॉप टेन’ मध्ये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र सरकारच्या 'आकांक्षित जिल्हा' मोहिमेतंर्गत उत्कृष्ट कामगिरी करत गडचिरोली जिल्ह्याने देशभरातील ११२ आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत पहिले १० मध्ये स्थान पटकावले आहे....

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना; कर्जमुक्ती योजनेबाबत वाचा संपूर्ण माहिती.. – कोण पात्र आणि कोण असणार अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकरी बांधव राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत.अनियमित पाऊस, गारपीट,दुष्काळ,अतिवृष्टी व महापूर यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी...

बहिणीचा छळ असह्य; जावयाचा साळ्यानेच केला खून.. – ५० हजाराची दिली सुपारी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गेल्या सहा वर्षापासून बहिणीचा छळ करीत असल्याच्या रागातून ५० हजाराची सुपारी देत चक्क साळ्यानेच जावयाचा गेम बजावला असल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात...

सावधान..! जिल्हा परिषद शाळांतील परिचर भरतीची सोशल मीडियावरील जाहिरात बनावट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सोशल मीडियावर जिल्हा परिषद शाळांमध्ये परिचर(Peon)पदभरतीसंदर्भात प्रसारित होत असलेली जाहिरात पूर्णपणे खोटी,बनावट आणि दिशाभूल करणारी असल्याचा अधिकृत खुलासा जिल्हा परिषदेचे मुख्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!