उद्रेक न्युज वृत्त
पुणे :- गुन्हा होण्यापूर्वी गुन्हे गारांची पार्श्वभूमी लक्षात घेत पुणे पोलिसांनी सोशियल मीडियावर कोयता घेऊन स्टेट्स ठेवणाऱ्या ९ जणांविरोधात गुन्हे शाखेच्या पथक ६ ने कारवाही करत गुन्हा दाखल केला आहे.९ पैकी ३ अल्पवयीन मुलांचा यात समावेश आहे.
सदर प्रकरणी तेजस संजय बधे (वय १९), उदय सिद्धार्थ कांबळे (वय १९), प्रसाद उर्फ बाबू धनंजय सोनवणे (वय १९, तिघेही रा. थेऊर, ता. हवेली), रोहित राजू जाधव (वय २०, रा. लोणी काळभोर, ता. हवेली), संग्राम भगवान थोरात (वय २८, रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली), श्याम गुरप्पा जाधव (वय ४३, रा. वानवडी, पुणे), तसेच तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
कोयता गँगवर आळा घालण्यासाठी पुणे पोलीस अलर्ट झाले आहेत.आपल्या घरात शस्त्रे बाळगणे किंवा घराच्या परिसरात शस्त्रे ठेवणे, तसेच बेकायदेशीर हत्यार विक्री करणाऱ्यांवर गुन्हा शाखेच्या पथकाने कारवाही केली होती.शहरात विविध ठिकाणी दहशद पसरवत असलेल्या कोयता गँगच्या मोरक्याला ताब्यात घेऊन गुन्हे दाखल केले आहेत.आपल्या विरोधाला आव्हान प्रतिआव्हान देण्यासाठी सोशियल मीडियावर काही टोळकी स्टेट्स ठेवतात,या स्टेट्समुळे अनेक स्वरुपाचे गुन्हे घडतात. त्याला आळा घालण्यासाठी आता पोलिसांनी कोयता घेऊन स्टेट्स ठेवणाऱ्यांवर कारवाईचा बळगा उगारून गुन्हा दाखल करीत आहेत.