Saturday, December 13, 2025
Homeगडचिरोलीसेवा जेष्ठता यादी डावलुन मुख्याध्यापक पदी नियुक्ती व शिक्षक भरतीतील भोंगळ कारभाराच्या...

सेवा जेष्ठता यादी डावलुन मुख्याध्यापक पदी नियुक्ती व शिक्षक भरतीतील भोंगळ कारभाराच्या चौकशीची मागणी- कैलास बगमारे -आरमोरी येथील महात्मा गांधी उच्च विद्यालयातील प्रकरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-सध्याच्या घडीला नागपूर जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये बनावट(बोगस)प्राथमिक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या गेल्याची माहिती समोर आली होती.नागपूर जिल्ह्यात जवळपास ५८० बोगस कर्मचाऱ्यांच्या नावाने वेतनाची उचल करून शासनाला कोट्यवधीचा चुना लावल्याचे सांगण्यात येत आहे.सदरचा प्रकार हा  २०१९ पासून विविध शाळांमध्ये सुरू होता.शालार्थ पोर्टलवर आढळलेल्या त्रुटींच्या आधारे तपासणी अंती,सदरची खळबळजनक बाब समोर आली होती.त्यानंतर शिक्षण विभागाकडून या सर्व शाळांची माहिती मागविण्यात आली.शिक्षण उपसचिवांच्या अध्यक्षतेत समिती तयार करून या प्रकरणाची चौकशी करण्यात आली.चौकशी अहवाल सादर केल्यानंतर आता कारवाईचा फास आवळला जात आहे.यात मोठे अधिकारीही गुंतले असल्याचे निष्पन्न झाले आहे. अशातच आता गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी येथील महात्मा गांधी उच्च विद्यालयातील सेवा जेष्ठता यादी डावलुन मुख्याध्यापक पदी नियुक्ती व शिक्षक भरतीतील भोंगळ कारभारची चौकशी तसेच अवैध मार्गाने गोळा केलेल्या संपत्तीची तात्काळ चौकशी करून चौकशीअंती दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी कैलास बगमारे यांनी आज,सोमवार ५ मे रोजी राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस,शिक्षण मंत्री, सहपालकमंत्री गडचिरोली, शिक्षण संचालक (माध्यमिक),महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे,विभागीय आयुक्त नागपूर,जिल्हाधिकारी गडचिरोली,पोलीस अधीक्षक गडचिरोली,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली तसेच शिक्षणाधिकारी(माध्यमिक)जिल्हा परिषद गडचिरोली यांच्याकडे केली आहे.
कैलास बगमारे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सध्या राज्यामध्ये गाजत असलेला बोगस अल्पसंख्याक, बोगस शालार्थ आयडी,बोगस शिक्षक भरती घोटाळा यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथील मनोहर भाई शिक्षण प्रसारक मंडळ आरमोरी द्वारा संचालीत महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालय आरमोरी व महात्मा गांधी कन्या विद्यालय आरमोरी या दोन विद्याशाखा कार्यरत आहेत.ह्यापैकी महात्मा गांधी उच्च विद्यालयात साईनाथ अद्दलवार यांची १५ जुलै २००६ रोजी शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती झाली.सन २०११ मध्ये महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालय आरमोरी येथे मुख्याध्यापक पदी कार्यरत असणाऱ्या व्यक्ती बद्दल नाहक गैरसमज निर्माण करून संस्थेप्रती असंतोष निर्माण करण्याचे काम अद्दलवार यांनी करून संबंधित व्यक्तीस मुख्याध्यापक पदावरून हटविण्यात यश प्राप्त केले.हे केवळ स्वतः मुख्याध्यापक पदी रुजू होण्यासाठी षडयंत्र रचल्याचे सर्व कर्मचाऱ्यांना दिसून आले आणि श्री.साईनाथ अद्दलवार हे शिक्षण सेवकाचा कालावधी घेऊन अवघ्या साडेपाच(५,१/२) वर्षातच दिनांक-१ डिसेंबर २०११ ला मुख्याध्यापक पदी रुजू झाले.आणि शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचे कडून तात्काळ मान्यताही मिळवून घेतली. त्यावेळी सेवाजेष्ठता यादी,बिंदूनामावली किंवा जातप्रवर्ग ह्या बाबींचा कोणताही विचार करण्यात आला नाही.कदाचित मुळ कागदपत्रावर खोडताड करूनही केवळ ह्या व्यक्तिकरीता संस्थेने हे पाऊल उचलले असु शकते हे नाकारता येत नाही.या बाबतीत संस्थेचे पदाधिकारी जेष्ठ शिक्षकांचे काही ऐकुण मायला तयार नव्हते.तोंडी किंवा लेखी तक्रारही दबाव निर्माण करून इतरांना दडपण्याचा प्रयत्न केला गेला. आणि सुमारे १५ ते १६ ज्येष्ठ शिक्षकांना हक्कनाक स्वतः हक्कापासुन वंचित राहावे लागले. नाईलाजाने २७-२८ वर्षे सेवा देणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अधिनस्त राहून सेवा करावी लागली किंवा काहींना स्वेच्छा निवृत्ती घ्यावी लागली.अश्या प्रकारे संस्था आणि मुख्याध्यापक यांनी विद्याशाखेत दुषित वातावरण निर्माण केले आणि सर्व कर्मचारी त्यांचे बळी ठरले.श्री अद्दलवार यांनी पदाचा दुरुपयोग करून आणि सर्वांना मुक्कामार देऊन पुर्ण कर्मचारी हतबल करण्याचे धाडस यांचे कडून होत असे. कोणताही कर्मचारी संस्थेपर्यंत पोहोचण्यास देखील पाबंदी घालण्यात आली.त्यामुळे विद्याशाखा वरपांगी निर्दोष दिसत असली,तरी आतील दहशत व आर्थिक लूट ह्या बाबी संस्थेला जराही माहीत होत नसत.हे अनेक कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी ह्यांच्या मार्फत जीवघेणी माहिती उपलब्ध झाली.केवळ ह्या एका व्यक्तीमुळे अनेक ज्येष्ठ शिक्षक पदोन्नती पासुन शेवटपर्यंत वंचितच राहिले.श्री. साईनाथ अद्दलवार हे एवढ्यात न थांबता त्यांनी पुर्व विदर्भातील गडचिरोली, गोंदिया,चंद्रपूर,भंडारा ह्या जिल्ह्यामध्ये अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शाळा वगळून इतर माध्यमिक शाळांमध्ये दिनांक-२ मे २०१२ पासुन राज्यामध्ये शिक्षक भरती बंद असतांना विविध शाळांमध्ये आपल्या नावाचे अस्तित्व दाखवून थेट मंत्रालयांमधुन शिक्षण उपसंचालक कार्यालय नागपूर येथून बनावट कागदपत्राद्वारे त्यांचे व्यक्तिगत शालार्थ आयडी शिक्षणाधिकारी यांच्या मान्यता मिळवून देण्याचे काम यांनी केलेले आहे.चक्क यांनी आपल्या शाळेमध्ये १८ ते २० शिक्षकांची नियुक्ती केली आहे. यामध्ये श्री.अद्दलवार यांनी शासनाला करोडो रुपयाचा चुना लावुन अल्पावधीमध्येच बेकायदेशीर करोडोची माया जमविल्याचे खात्रीशिर आहे.संस्थेअंतर्गत चालणाऱ्या विद्याशाखेतील विद्यार्थीसंख्या अभावी संचमान्यतेनुसार नियमीत शिक्षकांचे समायोजन बाहेरच्या शाळेत करत असायचे,तर शिक्षणाधिकारी यांनी इतर शाळेतील अतिरिक्त शिक्षकांना समायोजन करण्याचे आदेश देऊन सुद्धा संबंधित शिक्षकाला रुजू करून न घेता काही दिवसानंतर जाहिरात देऊन नवीन शिक्षकांची भरती केली गेली.सन २०१२ पासुन आजपर्यंतची ऑनलाईन संचमान्यता,बिंदू नियमावली, जातप्रवर्ग तसेच दरवर्षीची मान्यताप्राप्त सेवा जेष्ठता यादी तपासणी गरजेचे असतांना या मुख्याध्यापकाने गडचिरोली,नागपूर,मंत्रालय,शिक्षण संचालक पुणे येथे थेट प्रवास करून या शिक्षक भरती घोटाळ्याचे पारेमुरे खोलवर उजविण्याचे काम यांनी केले आहे.त्यामुळे
संबंधित व्यक्तीची उच्चस्तरीय समितीमार्फत त्यांच्या स्थावर मालमत्तेसह संपुर्ण प्रकरणाची चौकशी करावी व चौकशीअंती प्रसाशन किंवा राजकीय दबावाला बळी न पडता सबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करावा,अश्या मागणीची तक्रार कैलास बगमारे यांनी केली आहे. त्यामुळे येत्या काळात नागपूर जिल्ह्यासह गडचिरोली जिल्ह्यातीलही शालेय भ्रष्टाचार उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांसाठी पाच ब्रास मोफत वाळू साखरा व आंबेशिवणी डेपोतून..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीवर सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात एप्रिल २०२५ पासून आतापर्यंत वाळू/रेतीची ३८ प्रकरणे व...

नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात अनेकांना नायलॉन मांजाच्या धाग्यामुळे आपला जीव गमावावा लागला आहे.नायलॉन मांजाची विक्री करण्यावर बंदी असतांनाही काहीजण पैश्याच्या लालसेने...

दोन श्रीमंत तरुणींशी प्रेमप्रकरण; दोघिंसाठी चोरायचा दुचाक्या.. – ५० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी; २२ वर्षीय युवक ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपुर :-बीसीएचे शिक्षण घेणारा २२ वर्षीय युवक सोबतच एमपीएससीचे क्लासेस करतो.मध्यंतरी त्याची दोन श्रीमंत तरुणींशी मैत्री झाली आणि नंतर त्यांचे प्रेमप्रकरण सुरू...

आता शेत रस्ते आणि वहिवाटीच्या वादात मिळणार मोफत पोलीस संरक्षण; विधेयक मंजूर..

उद्रेक न्युज वृत्त :-शेत रस्ते आणि वहिवाटीच्या प्रश्नांवर जलद गतीने नोटीस बजावणे आणि त्यावर निर्णय घेणे शक्य होणार आहे.त्याचबरोबर,अर्जदार शेतकऱ्यांना आता मोफत पोलीस संरक्षण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!