Monday, July 13, 2026
Homeगडचिरोलीसुकन्या समृद्धी योजनेसाठी डाक विभागाचे विशेष अभियान - नागरीकांना योजनेतंर्गत ९ ते...

सुकन्या समृद्धी योजनेसाठी डाक विभागाचे विशेष अभियान – नागरीकांना योजनेतंर्गत ९ ते १० फेब्रुवारी कालावधीत उघडता येणार खाते

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :-  सुकन्या समृध्दी योजना केंद्र शासनाची मुलींसाठीची महत्वांकाक्षी योजना आहे.सदर योजना फक्त मुलींसाठी असून केंद्र शासनाची सर्वात कमी गुंतवणूकीची बचत योजना आहे.मुलींच्या लग्नाच्या वेळी किंवा उच्च शिक्षण घेताना या योजनेची गुंतवणूक अतिशय फायदेशीर ठरते.पोस्ट विभागाद्वारे सुकन्या समृध्दी योजनेचे खाते उघडण्याचे अभियान दिनांक ९ व १० फेब्रुवारी २०२३ कालावधी राबविण्यात येत आहे. 

केंद्र आणि राज्य शासनाद्वारे बँका किंवा पोस्ट ऑफीसमार्फत गुंतवणूकीच्या व बचत ठेवीच्या बऱ्याच योजना राबविल्या जातात.त्यापैकी सुकन्या समृध्दी योजना ही मुलींचे लग्न,शिक्षण,आरोग्य तसेच त्यांच्या उज्वल भविष्यासाठी गुंतवणूकीची बचत योजना आहे. यामध्ये मुलींच्या आई वडिल यांच्याकडून कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडून या योजनेचा लाभ मुलीच्या भविष्यासाठी घेऊ शकतात.

योजनेची वैशिष्टये:- 

सर्वात कमी २५० रुपये भरुन सुकन्या समृध्दी योजनेचे खाते चालू करता येते.१० वर्षाखालील मुलीचे खाते,मुलींचे आई-वडील अथवा कायदेशीर पालकाद्वारे उघडता येते. एका मुलीकरीता केवळ एकच खाते स्वीकारल्या जाईल.तर एका कुटूंबात केवळ दोनच खाते स्वीकारल्या जातील. एका वर्षात किमान रुपये २५० किंवा जास्तीत जास्त १.५ लाखापर्यंत रक्कम भरुन गुंतवणूक सुरु करता येते. खाते उघडल्याच्या तारखेपासून २१ वर्षांनी ते परिपक्व होते.व मुलींचे वय १८ वर्षे झाल्यानंतर ५० टक्कापर्यंतची जमा असलेली रक्कम खात्यातून काढता येते. या योजनेत व्याजदर आकर्षक असून वर्तमानामध्ये ७.६ टक्के व्याजदर आहे.या खात्याला भारतामध्ये कुठेही ट्रान्सफर करता येते.तसेच रक्कम बँकेतून,पोस्ट ऑफिस व पोस्ट ऑफिसमधून बँकमध्ये ट्रान्सफर करता येते.

योजनेच्या अधिक माहितीसाठी www.indiapost.gov.in या वेबसाईटवर भेट दयावी. तसेच जिल्हयातील नागरिकांनी सुकन्या समृध्दी खाते उघडण्यासाठी आपल्या जवळील पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा.असे आवाहन पोस्ट विभागामार्फत करण्यात येत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

यालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती...

तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या...

सिंदेवाहीत माकडांची दहशत कायम; दोन दिवसांत दोन जणांवर हल्ले,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला असून दोन दिवसांत दोन नागरिकांवर हल्ले झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वनविभागाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!