Saturday, August 22, 2026
Homeमुंबईसिलेंडरचा स्फोट; आग आटोक्यात आणण्यासाठी धावपळ,कामगार अडकल्याची भीती..

सिलेंडरचा स्फोट; आग आटोक्यात आणण्यासाठी धावपळ,कामगार अडकल्याची भीती..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-शहरातील अंधेरी पूर्व भागातील एमआयडीसी परिसरातील भंगारवाडीमध्ये चार ते पाच लाकडाच्या दुकानात मोठी आग लागली असल्याची घटना आज,शुक्रवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास घडली.लाकूड गोदाममध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे सदरची आग लागली.परिसरात आजूबाजूला मोठ्या प्रमाणात गाळे असून गाळ्यात केमिकल आणि लाकडाचा गोदाम असल्यामुळे जवळपास ८ ते १० गाळ्यांमध्ये आग वाढली.आगीने रौद्ररूप धारण करताच परिसरातील नागरिकांनी अग्निशामन दलास कळविले.अग्निशामन दल घटनास्थळी दाखल होत परिसरातील नागरिकांनीही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आगीत आठ ते दहा सिलेंडर स्फोट झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
गोदामांमध्ये मोठ्या संख्येने काम करणारे कामगार असून काही कामगार बाहेर निघाले,तर काही कामगार आत अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. परिसरातील पंधरा ते वीस घर आणि गोदाम जळून खाक झाले आहेत.घरात आणि गोदामांमध्ये मोठ्या प्रमाणात सिलेंडर असल्यामुळे ही आग वाढली. झोपडपट्टी मधून लोकांना बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून मोठ्या प्रमाणात सिलेंडर ब्लास्ट होत असल्यामुळे अग्निशामन दलातील जवानांना आग विझवण्यामध्ये अडथळा निर्माण होत आहे.दरम्यान,स्थानिक पोलीस आणि अग्निशामन दलाचे जवान घटनास्थळावर दाखल होऊन झोपडपट्टी खाली करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आमदार रामदास मसराम यांच्या वाढदिवसानिमित्त आंधळी येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त आज शनिवारी कुरखेडा तालुक्याच्या आंधळी गावातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात...

आता पोलीस दलातून निवृत्त होणारे श्वान राहणार पोलीस दलाचाच भाग..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य सरकारने पोलीस  दलातून निवृत्त होणाऱ्या श्वानांसाठी अत्यंत संवेदनशील निर्णय घेतला आहे.यापुढे १० वर्षे पूर्ण झाल्यानंतर श्वान पोलीस दलाच्या सेवेतून...

घरोघरी जाऊन रेशनचे धान्य खरेदी करणाऱ्या दोघांना घेतले ताब्यात.. -दोघांविरुद्ध अत्यावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-घरोघरी जाऊन नागरिकांकडून रेशनचे धान्य खरेदी करणाऱ्या दोघांना पोलिस व पुरवठा शाखेच्या संयुक्त पथकाने दोघांना ताब्यात घेत अत्यावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा...

वाढदिवस विशेष..! साधी राहणी,उच्च विचार आणि जनसेवेचा ध्यास- आमदार रामदास मसराम – राजकारण हे सत्तेचे माध्यम नसून जनसेवेचे साधन..

उद्रेक न्युज वृत्त :-शिक्षकी पेशातून समाजसेवेच्या व्यापक क्षेत्रात आणि तेथून लोकप्रतिनिधित्वाची जबाबदारी स्वीकारत जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!