Saturday, August 22, 2026
Homeमुंबईउद्योजकाला अटकेची भीती दाखवत ५० लाखाची खंडणी प्रकरणी पाच अधिकाऱ्यांना अटक...

उद्योजकाला अटकेची भीती दाखवत ५० लाखाची खंडणी प्रकरणी पाच अधिकाऱ्यांना अटक…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-करविषयक प्रकरणात एका उद्योजकाकडून ५० लाख रुपयांची लाच उकळल्याप्रकरणी वस्तू व सेवाकर विभागाच्या (जीएसटी) पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांना सीबीआयने अटक केली आहे.यापैकी दोन अधिकारी भारतीय महसूल सेवेतील आहेत तर उर्वरित अधिकारी जीएसटी विभागात अधीक्षक आहेत.जीएसटी विभागाचे अपर आयुक्त दीपक शर्मा,सहआयुक्त राहुल कुमार, अधीक्षक बिजेंद्र जनावा,निखिल अग्रवाल आणि नितीन गुप्ता अशी अटक केलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत.
सीबीआय माहितीनुसार,गोरेगावमधील एका कंपनीचे करविषयक प्रकरण हे अधिकारी हाताळत होते.या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान अधिकाऱ्यांनी संबंधित उद्योजकाला अटकेची भीती दाखवत त्याच्याकडे ८० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली.शेवटी ५० लाख रुपयांवर तडजोड झाली.मात्र,हे पैसे मिळेपर्यंत या अधिकाऱ्यांनी संबंधित उद्योजकाला १८ तास कार्यालयात बसवून ठेवले होते व त्याचा छळ केला, असा त्यांच्यावर आरोप आहे.उद्योजकाने आपल्या ओळखीच्या माध्यमातून या पैशांची जुळवाजुळव केल्यानंतर त्याला सोडण्यात आले.उद्योजकाने लाचखोरीसंदर्भात सीबीआयकडे तक्रार केली. सीबीआयने तक्रारीची पडताळणी केली.महसूल विभागाकडून संमती मिळाल्यानंतर सीबीआयने महसूल सेवेतील अधिकाऱ्यांना अटक केली.त्यानंतर या प्रकरणातील लाचेची ३० लाख रुपयांची रक्कम सीबीआयने जप्त केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता पोलीस दलातून निवृत्त होणारे श्वान राहणार पोलीस दलाचाच भाग..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य सरकारने पोलीस  दलातून निवृत्त होणाऱ्या श्वानांसाठी अत्यंत संवेदनशील निर्णय घेतला आहे.यापुढे १० वर्षे पूर्ण झाल्यानंतर श्वान पोलीस दलाच्या सेवेतून...

घरोघरी जाऊन रेशनचे धान्य खरेदी करणाऱ्या दोघांना घेतले ताब्यात.. -दोघांविरुद्ध अत्यावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-घरोघरी जाऊन नागरिकांकडून रेशनचे धान्य खरेदी करणाऱ्या दोघांना पोलिस व पुरवठा शाखेच्या संयुक्त पथकाने दोघांना ताब्यात घेत अत्यावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा...

वाढदिवस विशेष..! साधी राहणी,उच्च विचार आणि जनसेवेचा ध्यास- आमदार रामदास मसराम – राजकारण हे सत्तेचे माध्यम नसून जनसेवेचे साधन..

उद्रेक न्युज वृत्त :-शिक्षकी पेशातून समाजसेवेच्या व्यापक क्षेत्रात आणि तेथून लोकप्रतिनिधित्वाची जबाबदारी स्वीकारत जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांचा...

आरमोरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा.श्री.रामदासजी मसराम सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!💐💐 🎉शुभेच्छुक -आमदार रामदास मसराम मित्र परिवार

आरमोरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा.श्री.रामदासजी मसराम सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!💐💐 🎉शुभेच्छुक - आमदार रामदास मसराम मित्र परिवार

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!